Join us

ना एकदा ना दोनदा तीन वेळा हनीमून साजरा करणार आदित्य नारायण, जाणून घ्या कसा आहे प्लॅन....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 10:56 IST

1 / 10
आदित्य नारायणने गर्लफ्रेन्ड श्वेता अग्रवालसोबत मंगळवारी १ डिसेंबरला मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केलं. यानंतर त्याने मुंबईतच रिसेप्शन पार्टी ठेवली होती. कोरोनामुळे लग्नात आणि रिसेप्शनला मोजकेच पाहुणे आले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. आता चर्चा रंगली आहे त्यांच्या हनीमूनची.
2 / 10
आदित्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या हनीमून प्लॅनबाबत सांगितले होते. यात खास बाब ही आहे की, तो एक नाही, दोन नाही तर तिनदा हनीमूनला जाण्यासाठी तयार आहे.
3 / 10
श्वेता आणि आदित्य गेल्या १२ वर्षापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. हेच कारण आहे की, लग्न समारोहात एक वेगळाच जल्लोष दिसला. आदित्य नारायणने तर अनेकदा धमाकेदार डान्सही केला.
4 / 10
त्याचे वडील आणि प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनीही ढोलवर ठुमके लगावले. आदित्य नारायणने मुलाखतीत सांगितले की, हनीमून प्लॅनबाबत त्याने सांगितले की, 'त्याच्यासाठी दर आठवड्यात मुंबईत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याने ठरवलं आहे की, तो तीन वेळा छोट्या छोट्या सुट्टींवर जाणार आहे'.
5 / 10
यात आदित्य शिलिम, सुला वाइनयार्ड्स आणि गुलमर्गला जाणार आहे. शिलिम आणि सुला वाइनयार्ड हे दोन्ही महाराष्ट्रात आहे तर गुलमर्ग जम्मूमध्ये आहे. सध्या तेथील वातावरण फारच मनमोहक आहे. कारण तिथे बर्फवृष्टी होते आहे.
6 / 10
7 / 10
8 / 10
9 / 10
10 / 10
टॅग्स :आदित्य नारायणलग्नटेलिव्हिजन