घाऱ्या डोळ्यांची नायिका! 'बॉर्डर'मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता दिसते अशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:34 IST
1 / 8 काही चित्रपट हे अनेकवेळा पाहूनही त्यांचा कंटाळा येत नाही. साल १९९७ साली प्रदर्शित झालेला असाच एक चित्रपट जो आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात.या चित्रपटाचं नाव म्हणजे बॉर्डर.2 / 8 उत्कृष्ट कलाकार, कसदार अभिनय, मनाला भिडणारे संगीत या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे या चित्रपटाने १९९७ साली सर्वाधिक कमाई केली होती. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.3 / 8 भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला 'बॉर्डर' चित्रपट प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवणारा चित्रपट आहे. 4 / 8 या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, कुलभूषण खरबंदा यांसारख्या कलाकारांनी आपली भूमिका पडद्यावर जिवंत केली. 5 / 8 दरम्यान, या चित्रपटात सुनील शेट्टीच्या रुपात एका भारतीय सैनिकाचं वैवाहिक आयुष्य दाखवण्यात आलं होतं. बॉर्डरमध्ये अभिनेत्री शरबानी मुखर्जी यांनी सुनील शेट्टीची ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारली होती.6 / 8 चित्रपटात सुनील शेट्टी आणि शरबानी यांच्यावर वर चित्रीत केलेलं 'तो चलूँ, तो चलूँ...' हे गाणे आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, या चित्रपटानंतर शुभांगी इंडस्ट्रीपासून दुरावली.7 / 8 अभिनय क्षेत्रापासून दूर असल्या तरी शरबानी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय असल्याच्या पाहायला मिळतात. बॉर्डर चित्रपटातील ही घाऱ्या डोळ्यांची नायिका आता फारच बदलली आहे. 8 / 8शरबानी मुखर्जींचा २८ वर्षानंतर लूक पूर्णपणे बदलला आहे. त्या ओळखूच येत नाही.