By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:35 IST
1 / 7मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या सिनेमाने तब्बल १००० कोटी कमावले. सिनेसृष्टीत गाजलेली ही अभिनेत्री आता डॉक्टर झाली आहे. 2 / 7ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे श्रीलीला. काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'पुष्पा २' सिनेमात श्रीलीलाने आयटम साँग केलं होतं. या सिनेमाने तब्बल १००० कोटी कमावले होते.3 / 7 श्रीलीलाने मुंबईतील प्रसिद्ध 'डी. वाय. पाटील विद्यापीठा'तून (D.Y. Patil University) एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. १० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात (Graduation Ceremony) तिला ही पदवी प्रदान करण्यात आली. 4 / 7गेल्या सहा वर्षांपासून चित्रपट आणि शिक्षण अशा दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर अखेर तिने तिची वैद्यकीय पदवी (MBBS) पूर्ण केली आहे. ही आनंदाची बातमी कळताच चाहत्यांनी श्रीलीलाचं कौतुक केलं आहे.5 / 7श्रीलीलाचा पदवी स्वीकारतानाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अभिनयासोबत मी शिक्षणातही सरस आहे, हेच श्रीलीलाने दाखवून दिलंय6 / 7श्रीलीलाने २०२० मध्ये आपल्या वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात केली होती. याच काळात तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 7 / 7अभिनयाचा व्याप सांभाळत वैद्यकीय शिक्षणासारखा कठीण विषय पूर्ण करणे सोपे नव्हते, मात्र श्रीलीलाने हे शक्य करून दाखवले. चाहते श्रीलीलाचं मनापासून अभिनंदन करत आहेत.