By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:54 IST
1 / 7बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याने अनेक वर्षांनी त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. आई-वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावल्याने माझं पत्नीवर प्रेम नाही, असा मोठा खुलासा त्याने केलाय.2 / 7हा अभिनेता म्हणजे निरहुआ. भोजपुरी स्टार असलेला निरहुआ सध्या त्याने वैयक्तिक आयुष्याविषयी जे विधान केलं त्यामुळे चर्चेत आला आहे. काय म्हणाला निरहुआ?3 / 7डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत निरहुआ म्हणाला, ''माझ्या आईवडिलांनी माझ्यावर लग्नाची जबरदस्ती केली होती. मला आधी काहीतरी करायचं होतं, काहीतरी बनायचं होतं, हे मी त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही.''4 / 7''त्यामुळे मला ही खंत कायम वाटत राहिली. आपण ज्याच्यावर प्रेम करु असा जीवनसाथी असायला हवा. माझ्यासोबत असं घडलं नाही. मी माझ्या पत्नीला आणि मुलांनाही हे सांगितलंय की, मला कधीही त्यांच्याबद्दल प्रेम वाटलं नाही.'', असंही निरहुआ म्हणाला.5 / 7''आई-वडिलांनी लग्न लावून दिल्याने मी फक्त ती जबाबदारी सांभाळतोय, बाकी काही नाही.''; अशा शब्दात निरहुआने खुलासा केला. ही गोष्ट निरहुआने त्याच्या पत्नीलाही सांगितली आहे, असंही तो म्हणाला.6 / 7''मी कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडतोय. परंतु माझ्या मुलांसोबत मी असं होऊ देणार नाही. त्यांना त्यांचे जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार असेल'', असंही निरहुआ शेवटी म्हणाला.7 / 7निरहुआ अर्थात दिनेश लाल यादवने मंशा यादवसोबत लग्न केलं होतं. २००० साली त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे.