Join us

... म्हणून प्रकाश राज यांनी केलं दुसरं लग्न, सुंदर असूनही अभिनेत्री नाहीये पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 18:34 IST

1 / 10
बॉलिवूड, टॉलिवूड अभिनेता प्रकाश यांनी वयाच्या 45 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. एका कठिण प्रसंगातून जात असताना त्यांच्या आयुष्यात 32 वर्षीय टोनीची एंट्री झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यामुळे त्यांनी टोनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
2 / 10
टोनी सिनेक्षेत्रातच करिअर करत असून ती कोरिओग्राफर आहे. एका चित्रपटादरम्यान, प्रकाश राज आणि टोनी यांची जवळीक वाढली. या चित्रपटाच्या कोरिओग्राफीचं काम तिच्याकडे होतं.
3 / 10
टोनी ही प्रकाश यांच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान आहे, तरीही ती राज यांच्या प्रेमा पडली. हळहूळ या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं अन् आता त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला 11 वर्षे पूर्ण झाले आहेत.
4 / 10
प्रकाश आणि टोनी यांनी 24 ऑगस्ट 2010 रोजी लग्न केलं. यापूर्वी 1994 साली त्यांनी तमिळ अभिनेत्री ललिताकुमार हिच्याशी विवाह केला होता. त्यांच्यापासून राज यांना दोन मुली व एक मुलगा आहे.
5 / 10
राज यांचे पहिले लग्न तुटल्याने त्यांनाही अतिशय वेदना झाल्या. सर्वकाही आनंदात सुरू असताना, त्यांच्या आयुष्यात मोठी दुर्घटना घडली. सन 2004 मध्ये त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाचे निधन झालं.
6 / 10
या घटनेनं राज आणि त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. मेघना आणि पूजा या दोन मुलींवरही दु:खाचा डोंगर कोसळला. पतंग उडवताना टेबलावरुन पडल्याने सिद्धूचा मृत्यू झाला होता.
7 / 10
राज यांच्या पत्नी ललिता यांना या घटनेचा मोठा धक्का बसला. त्यातूनच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2011 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.
8 / 10
त्यानंतर, 2014 मध्ये आजच्या दिवशी प्रकाश यांनी दुसरं लग्न केलं. आज राज यांच्या दुसऱ्या लग्नाचा 11 वा वाढदिवस आहे. त्यामुळे, त्यांनी ट्विटरवर लग्नाचा फोटोही शेअर केला आहे.
9 / 10
प्रकाश यांनी डार्लिंग वाईफ म्हणत पोनीला चांगली मैत्रीण, प्रेमिका आणि माझी ट्रॅव्हलर असे म्हटलंय. तर, 11 वर्षांपासून आपण दोघांनी एकमेकांचा जीव घेतला नाही, एक अनोळखी आज माझं सर्वकाही आहे, असे पोनीने म्हटलंय.
10 / 10
प्रकाश राज यांचं कुटुंब एकत्र असून त्यांच्या मुलांसह पोनीने रक्षाबंधनाचा फॅमिली फोटो शेअर केला आहे.
टॅग्स :प्रकाश राजलग्नबॉलिवूडTollywoodसिनेमा