Siddharth Jadhav : 'हा फोटो पाहून कुणी "BOB marley" तर मारली..' आपल्या सिद्धूचे जलवे; नवीन फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 11:04 IST
1 / 6अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांच्यातलं एखादं साम्य असेल तर ते त्यांचे लुक. सिद्धार्थही वेगवेगळे लुक करण्यात पटाईत आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने लाल जॅकेट, गोल्डन शूज मध्ये फोटो पोस्ट केले होते. यानंतर तो चांगलाच ट्रोल झाला.2 / 6आता सिद्धार्थचा नवीन लुक मधला फोटो समोर आलाय. सफारी, हातात माईख, कुरळे केस आणि गॉगल असा ब्लॅक अॅंड व्हाईट हा फोटो आहे. हे बघून चाहत्यांनाही प्रश्न पडलाय की सिद्धूचं हे नक्की चाललंय तरी काय.3 / 6हा फोटो पाहून कुणी बॉब मार्ले तर मारली असं गंमतीशीर कॅप्शन त्याने दिले आहे. यावर मराठी कलाकार खळखळ हसत आहेत. पण तरी प्रश्न राहतोच की सिद्धूने हा लुक नेमका कशासाठी केलाय.4 / 6तर रितेश जिनिलियाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या वेड या सिनेमात सिद्धू आणि जितेंद्र जोशी यांचा कॅमिओ आहे. सिनेमाच्या सुरुवातीला दोघांना कॉमेंट्री करताना दाखवले आहे. तर यामध्ये सिद्धू चा हा ब्लॅक अॅंड व्हाईट बॉब मार्लेलुक आहे जो सध्या चर्चेत आहे.5 / 6सिद्धार्थ जाधवचा नुकताच सर्कस हा सिनेमा आला. रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमात त्याने केलेली विनोदी भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरली. तर सिद्धू आणि रणवीर सिंगची मैत्रीही अगदी पक्की झाली आहे.6 / 6याशिवाय सर्कसच्या आधी सिद्धार्थचा बालभारती हा मराठी सिनेमा आला ज्याला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. सध्या सिद्धार्थ होऊ दे धिंगाणा या शोचे सूत्रसंचालनही करत आहे.