Join us

आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 20:14 IST

1 / 6
कलाक्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. देशभरातील चित्रपटांमध्ये मराठी सिनेसृष्टीने आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवले. पाहा पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांची यादी...
2 / 6
या चित्रपटासाठी दिग्दर्शक आशिष बेंडे याला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Best Debut Film of a Director) हा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रूपये आणि सुवर्ण कमळ असे आहे.
3 / 6
या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (Best Children's Film) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रूपये आणि सुवर्ण कमळ असे आहे.
4 / 6
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (Best Marathi Film) या विभागात श्यामची आई या सिनेमाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुजय डहाके याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पुरस्काराचे स्वरूप चांदीचे कमळ आणि २ लाख रूपये असे आहे.
5 / 6
सर्वोत्कृष्ट बालकलाकार (Best Child Artist) या विभागातील दुसरा पुरस्कारही मराठी चित्रपटातील कलाकारांना मिळाला आहे. नाळ २ चित्रपटातील बालकलाकार त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप या तिघांनीही पुरस्कार जाहीर झाला आहे.
6 / 6
सर्वोत्कृष्ट बालकलाकार या विभागातील पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. यात मराठी चित्रपट जिप्सीसाठी कबीर खंदारे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार (Best Child Artist) हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप चांदीचे कमळ आणि २ लाख रूपये आहे. हे तीन विजेत्यांमध्ये विभागले जाणार आहे.
टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारनाळमराठीमराठी चित्रपटनागराज मंजुळेसुजय डहाके