Join us

Shweta Tiwari : "मला दुसरी मुलगी नको"; पलकच्या 'या' कृतीने घाबरली श्वेता तिवारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:16 IST

1 / 9
टीव्ही ते चित्रपटांपर्यंत आपल्या दमदार अभिनय कौशल्याची झलक दाखवणारी श्वेता तिवारी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दोन लग्नं आणि घटस्फोटांनंतर श्वेता आता तिच्या दोन्ही मुलांसह चांगले जीवन जगत आहे.
2 / 9
श्वेतासोबतच तिची मुलगी पलक तिवारीही सध्या खूप चर्चेत आहे. चाहते या आई-मुलीच्या जोडीवर खूप प्रेम करतात. पलक व्यतिरिक्त श्वेताला रेयांश नावाचा मुलगा देखील आहे.
3 / 9
श्वेताच्य़ा एका जुन्या विधानाची आता पुन्हा जोरदार चर्चा रंगली आहे. २०२० मध्ये श्वेता तिवारीने पिंकव्हिलाशी झालेल्या संभाषणात सांगितलं होतं की, तिला पलकनंतर दुसरी आणखी एक मुलगीच हवी होती.
4 / 9
श्वेताने त्यानंतर तिचा हा निर्णय का बदलला हे सांगितलं आहे. श्वेता तिवारीने खुलासा केला की, पलक १६ वर्षांची होती तेव्हा ती प्रेग्नेंट होती.
5 / 9
'पलक तिच्या १६ व्या वाढदिवशी बाहेर गेली आणि १ लाख ८० हजार रुपयांचे मेकअप प्रोडक्ट खरेदी केले, खूप महागडे प्रोडक्ट होते. प्रत्येक आयशॅडो ७,००० ते ८,००० रुपयांचा होता.'
6 / 9
'मी यानंतर माझ्या कुटुंबियांना फोन केला आणि सांगितलं की मला आता मुलाला जन्म द्यायचा आहे. पलकची महागडी खरेदी पाहिल्यानंतर मी इतके पैसे खर्च करू शकत नाही. मला दुसरी मुलगी नको आहे' असं श्वेताने म्हटलं आहे.
7 / 9
या मुलाखतीत श्वेताची मुलगी पलक देखील तिच्यासोबत होती. पलकनेही तिच्या आईबद्दलच्या अनेक गोष्टीही शेअर केल्या.
8 / 9
पलकने सांगितलं की लहानपणी ती तिच्या आईला कधीकधी 'दीदी' म्हणायची कारण ती तिच्या बहिणीसारखी वाटायची.
9 / 9
श्वेता आणि पलक अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
टॅग्स :श्वेता तिवारीपलक तिवारीबॉलिवूडटिव्ही कलाकारटेलिव्हिजन