समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतला' भूमिकेवर चाहते झाले फिदा; ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 10:09 IST
1 / 8समंथा रुथ प्रभू 'शकुंतला' या भूमिकेतून लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात समंथा एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.2 / 8प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास यांच्या 'कालिदास शाकुंतलम' या महाकाव्यावर बनत असलेल्या चित्रपटात समंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 3 / 8नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शकुंतलम' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शकुंतलाला मिळालेला शाप, तिची प्रेमात फसवणूक आणि तिच्या आयुष्यातील अडचणी खूप छान दाखवण्यात आल्या आहेत. 4 / 8समंथाच्या चाहत्यांना 'शकुंतलम' चित्रपटाचा हा ट्रेलर खूपच आवडला आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने पुन्हा एकदा साऊथची ही अभिनेत्रीने चाहत्यांना घायाळ करणार आहे.5 / 8'शकुंतलम' या चित्रपटात देव मोहन राजा दुष्यंतची भूमिका साकारत आहे. समंथा आणि देव मोहनच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनीही ग्रीन सिग्नल दिला आहे. 6 / 8सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या 'शकुंतलम' चित्रपटाच्या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये समंथा आणि देव मोहन यांच्या भूमिकेचे कौतुक चाहत्यांकडून केले जात आहेत.7 / 8दरम्यान, समंथाचा 'शकुंतलम' हा चित्रपट अल्लू अर्जुनसाठी देखील खूप खास आहे, कारण या चित्रपटात त्याची 6 वर्षांची मुलगी दिसणार आहे.8 / 8अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटातील 'ओ अंटावा' या ब्लॉकबस्टर गाण्यामुळे समंथाला देशभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. याशिवाय 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमध्ये तिने आपल्या दमदार अभिनय कौशल्याची झलक दाखवली.