Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिमा लागू यांचा 'जावई' कोण माहितीए का? हिंदी चित्रपटसृष्टीत आहे मोठं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:16 IST

1 / 8
हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत मॉडर्न आई असं ज्यांना म्हणलं जायचं त्या अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) यांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या चित्रपटातील अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.
2 / 8
1990 साली आलेल्या सुपरहिट 'आशिकी' सिनेमात रिमा लागू यांनी राहुल रॉयच्या आईची भूमिका साकारली होती. नंतर सलमान खानचा 'मैने प्यार किया' असो किंवा हम साथ साथ है किंवा हम आपके है कौन या सर्वच चित्रपटात त्या प्रेमळ आईच्या भूमिकेत दिसल्या. याउलट 'वास्तव' सिनेमात त्यांनी साकारलेली संजय दत्तच्या आईची भूमिका विशेष गाजली.
3 / 8
रिमा लागू यांचं प्रोफेशनल आयुष्य तर सगळ्यांनाच माहित आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशी कोणाला कल्पना नाही. त्यांची लेक मृण्मयी लागू (Mrunmayee Lagoo) देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहे.
4 / 8
मृण्मयीने 'पीके','तलाश','जिंदगी ना मिलेगी दोबारा' यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले.
5 / 8
तर मृण्मयीने 2014 मध्ये विनय वायकूळशी लग्न केले. ते रिमा लागू यांचे जावई आहेत हे खूप कमी जणांना माहित असेल. विनय हे देखील हिंदी सिनेमात सह दिग्दर्शक म्हणून काम करतात.
6 / 8
विनय वायकूळ यांनी 'दंगल','थ्री इडियट्स','गजनी','भाग मिल्खा भाग','स्वदेश' सारख्या सुपरहिट हिंदी सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
7 / 8
विनय यांनी अनेक वेबसिरीजचेही दिग्दर्शन केले आहे. सोनाली बेंद्रेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'द ब्रोकन न्यूज' चे दिग्दर्शन केले होते. याशिवाय रवीना टंडनच्या 'अरण्यक' या सिरीजचेही त्यांनी दिग्दर्शन केले.
8 / 8
मृण्मयी लागूने पती विनय वायकूळसह अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघंही सिनेसृष्टीत काम करत असतानाच एकमेकांना भेटले आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झाले. आता त्यांच्या लग्नाला ९ वर्ष झाली आहेत.
टॅग्स :रिमा लागूपरिवारव्हायरल फोटोज्बॉलिवूडसिनेमा