रवीना टंडनची लेकीसोबत युरोप ट्रीप, 49व्या वर्षीही दिसतेय फीट अन् सुंदर; शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:32 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) वयाच्या 49 व्या वर्षीही कमालीची सुंदर आणि फीट दिसते. ८० ते ९० चं दशक गाजवणारी ही अभिनेत्री आता ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते.2 / 7रवीनाची लेक राशा थडानीही (Rasha Thadani) सध्या चर्चेत असते. राशाचं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असून तिच्या इंडस्ट्रीतील पदार्पणाची चर्चा आहे. शिवाय आई प्रमाणेच राशाही अतिशय सुंदर आहे.3 / 7मायलेकी सध्या परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. युरोप ट्रीपमधील मनमोहक ठिकाणांचे फोटो शेअर केलेत. बुडापेस्ट, हंगेरी याठिकाणचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.4 / 7ऑलिव्ह ग्रीन रंगाचा कोऑर्ड सेट या आऊटफिटध्ये रविनाने पोज दिली आहे. नो मेकअप लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे.5 / 7तर राशा ब्लॅक आऊटफिटमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. मायलेकीचा हा सेल्फी खूपच गोड आला आहे. 6 / 7रवीनाने आपल्या डे टूरचीही झलक यामध्ये दाखवली. बुडापेस्टचं आर्किटेक्चरल सौंदर्य यामध्ये दिसत आहे. 'ऑल इन अ डेज वर्क' #Budapest असं कॅप्शन तिने दिलं आहे.7 / 7रवीनाने 2004 साली फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत लग्न केलं. 2005 साली तिने राशाला जन्म दिला. तर 2008 साली तिला मुलगा झाला. रणबीरवर्धन असं त्याचं नाव आहे.