Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos: पारंपरिक साज अन् श्रृंगार! प्राजक्ता माळीने शेअर केला 'फुलवंती' मधला फेवरिट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 14:26 IST

1 / 7
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या 'फुलवंती' चं जोरदार प्रमोशन करत आहे. ११ ऑक्टोबर रोजी फुलवंती संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सिनेमाने आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं असून अजूनही शोज जोरात सुरु आहेत.
2 / 7
सिनेमा प्राजक्ता माळी 'फुलवंती' तर अभिनेता गश्मीर महाजनी महापंडित शास्त्री बुवांची भूमिका साकारली आहे. 'फुलवंती'चा भर दरबारात शास्त्री बुवांकडून अपमान होतो आणि त्यानंतर ती त्यांना मोठं आव्हान देते. यानंतर जे जे घडतं ते अलौकिक आहे.
3 / 7
प्राजक्ताने फुलवंती मधील तिच्या लूकचे काही फोटो नुकतेच शेअर केलेत. या सिनेमात ती प्रचंड सुंदर दिसली आहे.
4 / 7
सौंदर्याला शब्दांची धार असं काहीसं फुलवंतीचं रुप सिनेमात पाहायला मिळतं. प्रचंड अहंकार असलेली फुलवंती शास्त्री बुवांच्या प्रेमात पडते आणि चक्क पैजच हरते.
5 / 7
प्राजक्ताचं 'फुलवंती' हे रुप अगदी न्याहाळात राहावं असंच आहे. जांभळी साडी, पारंपरिक साज, तीक्ष्ण नजर या लूकमध्ये प्राजक्ताने मन जिंकलं आहे.
6 / 7
प्राजक्ताचं सौंदर्याची स्तुती करावी तितकंच तिने केलेलं कमाल नृत्य सुद्धा अनुभवण्यासारखं आहे. 'फुलवंती' आणि 'मदनमंजिरी' ही दोन गाणी तर धुमाकळू घालतच आहेत.
7 / 7
प्राजक्ता नृत्य सादर करतानाचेही काही फोटो कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. यातील तिचे हावभाव, नृत्य कौशल्य वाखणण्याजोगं आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतासोशल मीडियामराठी चित्रपट