1 / 9बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रींना कोणत्याही परिचयाची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊयात या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मानधन?2 / 9रश्मिका मंदाना साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे पण तिने गुडबॉय, अॅनिमल सारखे सुपरहिट हिंदी चित्रपट केले आहेत. लवकरच ती सिकंदर सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सलमान खान दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका एका सिनेमासाठी ५ ते ८ कोटी रुपये मानधन घेते.3 / 9 अभिनेत्री कंगना राणौत सध्या राजकारणात सक्रीय आहे. तिचा लवकरच इमरजेंसी हा चित्रपट भेटीस येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना राणौत एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये मानधन घेते. 4 / 9कतरिना कैफचा शेवटचा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र तरीदेखील तिची इंडस्ट्रीत चांगलीच डिमांड आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ती एका सिनेमासाठी १५ ते २० कोटी रुपये फी घेते.5 / 9श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट स्त्री २ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका सिनेमासाठी १० ते १५ कोटी रुपये घेते.6 / 9क्रू चित्रपटाच्या यशानंतर करीना कपूरची डिमांडदेखील वाढली आहे. ती सिंघम अगेनमध्ये झळकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बेबो एका सिनेमासाठी ८ ते १० कोटी रुपये मानधन घेते.7 / 9 आलिया भट टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,ती एका चित्रपटासाठी १२ ते १५ कोटी मानधन घेते.8 / 9पठाणसारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका पादुकोण सिंघम अगेन आणि 'कल्कि 2898 एडी' यासारख्या दमदार चित्रपटात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका एका सिनेमासाठी २० ते ३० कोटी मानधन घेते.9 / 9बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा बऱ्याच वर्षांपासून हिंदी सिनेमात काम करताना दिसली नाही. मात्र आगामी काळात ती काही सिनेमात ती दिसणार आहे. सध्या प्रियंका चोप्रा बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती एका चित्रपटासाठी ४० कोटी मानधन घेते.