1 / 9बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) आता सक्रीय राजकारणात उतरली आहे. लोकसभा २०२४ मध्ये दणदणीत विजय मिळवत तिने संसदेत एन्ट्री घेतली आहे. 2 / 9खासदार कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली. मंडी ही तिची जन्मभूमीच आहे. तिचं संपूर्ण कुटुंब मंडीतच वास्तव्यास आहे.3 / 9कंगना वयाच्या १५ व्या वर्षीच घरातून पळून मुंबईला आली होती. अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिने गँगस्टर सिनेमातून पदार्पण केलं होतं. या प्रवासात तिला अनेक अडचणी आल्या पण तिने स्वत:चं वेगळं स्थान मिळवलं.4 / 9आता कंगना बॉलिवूड सोडून पुन्हा मंडीत स्थायिक होण्याची चर्चा आहे. खासदार झाल्याने ती तिथेच राहून जनतेची सेवा करणार आहे. कंगनाचा मंडीत निसर्गाच्या सान्निध्यात आलिशान बंगला आहे. ज्याची किंमतच तब्बल 30 कोटी आहे. 5 / 9बंगल्यातील इंटेरियर अगदीच रॉयल आहे. हिमाचली पेंटिंग, महागडे गालिचे, झुंबर, लाकडी वस्तूंनी तिचं घर सजलं आहे.6 / 9शिवाय तिच्या घरात सुंदर आणि प्रशस्त देवघरही आहे. इथे गणपतीची सुंदर मूर्ती विराजमान आहे. प्रत्येक सणाला कंगना आईसोबत, इतर कुटुंबातील सदस्यांसोबत फोटो शेअर करत असते.7 / 9घरात एक नाही तर बरेच आलिशान बेडरुम आहेत. रॉयल फील देतील असाच बेडरुममधला माहोल आहे. मोठा बेड, ड्रेसिंग टेबल, आकर्षक पण तितकेच साधे पडदे लाकडी छप्पर यामुळे असा बेडरुम लूक आहे.8 / 9तसंच घरात एक लाऊंज एरिया आहे जिथे पूल टेबल आहे. तसंच बाजूला आराम करण्यासाठी छोटा सोफा आहे.9 / 9घराबाहेरचा नजाराही अगदी कमाल आहे. निसर्गाचं सुंदर दृश्य तिला घरात बसूनच पाहायला मिळतं. अर्थात तिनेही आपलं घर, आजूबाजूचा परिसर सुंदर, स्वच्छ ठेवला आहे.