'अवंतिका' मालिकेतील सौरभ आता काय करतो माहितीये का? झालाय कमालीचा बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:00 IST
1 / 10आज छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या मालिकाच्या गर्दीत अशा काही मालिका आहेत ज्या कायम स्वरुपी प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'अवंतिका'.2 / 10 लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि संदिप कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका त्या काळी तुफान गाजली.3 / 10 या मालिकेमध्ये मृणाल कुलकर्णीने अवंतिका ही भूमिका साकारली होती. तर अभिनेता संदिप कुलकर्णी याने सौरभ ही भूमिका साकारली होती. 4 / 10तुफान गाजलेल्या या मालिकेच्या कलाकारांमध्ये आता प्रचंड बदल झाला असून प्रत्येक कलाकार आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जात आहेत. यामध्येच आज आपण सौरभ म्हणजे संदिप कुलकर्णी काय करतात हे जाणून घेऊयात. 5 / 10 अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेल्या संदिप कुलकर्णी यांच्यात आता कमालीचा बदल झाला आहे.6 / 10डोंबिवली फास्ट, कृतांत, अधांतरी, श्वास अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.7 / 10 संदिप कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ते त्यांच्या कुटुंबासोबतचे किंवा कलाविश्वातील काही फोटो शेअर करत असतात.8 / 10संदिप कुलकर्णी अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या काही इव्हेंटचेही फोटो शेअर करत असतात.9 / 10मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज कलाकारांच्या यादीत त्यांचं काम नाव घेतलं जातं.10 / 10संदिप कुलकर्णी यांनी मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. (फोटो सौजन्य : संदिप कुलकर्णी फेसबुक पेज)