Join us

"जास्त मैदा खाल तर..."; प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; फरसाण खाण्यावरही दिली प्रतिक्रिया

By देवेंद्र जाधव | Updated: July 13, 2025 12:19 IST

1 / 7
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध मालिका, सिनेमा, नाटकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
2 / 7
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय. या शोमध्ये प्राजक्ताच्या फरसाण खाण्यावरुन तिची अनेकदा खिल्ली उडवली गेली. यावर प्राजक्ता माळीने तिची प्रतिक्रिया दिली आहे
3 / 7
प्राजक्ताने एका मुलाखतीत सांगितलं की, उत्तम खाणं आणि उत्तम दिनचर्या या दोन गोष्टी मी पाळते. मला असं वाटतं ना, तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता. त्यामुळे काय खायचंय याचा निर्णय तुमच्यावर आहे.
4 / 7
तुम्ही जर मैदा भरपूर खात असाल तर तुम्ही मैद्यासारखे होणार आहात, असं म्हणत प्राजक्ताने लठ्ठपणाचे हावभाव करुन तिच्या चाहत्यांना आरोग्याचा कानमंत्र दिला. याशिवाय फरसाण खाण्यावरही प्राजक्ताने प्रतिक्रिया दिली.
5 / 7
फरसाण खरंच मी खाते. आजच दुपारी मी जेवले तर मटकीची भाजी होती. आता नुसतं मटकीची भाजी आणि पोळी कसं काय ना! त्यामुळे त्याच्यामध्ये मी फरसाण टाकून खाल्ला. किंवा दोडक्याची भाजी असते कधीकधी तर त्यावर मी फरसाण टाकून खाते.
6 / 7
जेवढं हास्यजत्रेमुळे मी फरसाण खाते हे ग्लोरीफाय केलं गेलं, तेवढं मी नाही खात. खूप कमी फरसाण खाते, अशा शब्दात प्राजक्ताने तिच्या फरसाण खाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
7 / 7
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'फुलवंती', 'चिकी चिकी बुबुम बुम' अशा सिनेमात दिसून आली. याशिवाय ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय
टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेतामराठी चित्रपट