Join us

आता कुठे आहे 'पक पक पकाक'मधली साळू? लूक इतका बदलला की ओळखताच येणार नाही

By देवेंद्र जाधव | Updated: July 22, 2025 13:42 IST

1 / 7
'पक पक पकाक' सिनेमा चांगलाच गाजला. २००५ साली हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडला. याच सिनेमातील साळूची भूमिका चांगलीच गाजली
2 / 7
चिखलूवर प्रेम करणारी, त्याची काळजी घेणारी साळू अभिनेत्री नारायणी शास्त्रीने साकारली. या सिनेमानंतर साळू अर्थात नारायणी मराठी सिनेमात इतकी दिसली नाही
3 / 7
नारायणी शास्त्रीने नंतर मराठी इंडस्ट्रीनंतर हिंदी टेलिव्हिजनची वाट धरली. क्योकी साँस भी कभी बहू खी, कुसुम अशा गाजलेल्या मालिकांमध्ये नारायणी झळकली
4 / 7
रिश्तो का चक्रव्यूह मालिकेत नारायणीने साकारलेली पॉवरफूल बिझनेसमनची भूमिका चांगलीच गाजली. नारायणीला या भूमिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली
5 / 7
नारायणी सोशल मीडियावर विविध अंदाजात फोटोशूट करताना दिसते. धारदार नजर आणि बोल्ड अदा असलेले नारायणीचे फोटो चांगलेच व्हायरल होत असतात
6 / 7
नारायणी अभिनेता गौरव चोप्रासोबत रिलेशनशीपमध्ये होती. या दोघांनी नच बलिएमध्ये भाग घेतलेला. पण २०१५ मध्ये नारायणीने स्टीव्हन ग्रॅव्हर नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं
7 / 7
नारायणी 'पक पक पकाक'नंतर मराठी सिनेमात इतकी रमली नाही. पण हिंदी इंडस्ट्रीत विविध भूमिका करुन तिने स्वतःची ओळख मिळवली
टॅग्स :नारायणी शास्त्रीनाना पाटेकरटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेतामराठी चित्रपट