निरागस चेहरा अन् बोलके डोळे! 'एलिझाबेथ एकादशी' मधील 'हा' बालकलाकार आठवतोय, आता काय करतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:42 IST
1 / 7परेश मोकाशी दिग्दर्शित 'एलिझाबेथ एकादशी' हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. 2 / 7या चित्रपटात सायली भांडाकवठेकर, श्रीरंग महाजन, पुष्कर लोणकर तसेच नंदिता धुरी हे कलाकार झळकले. 3 / 7यामध्ये बालकलाकार श्रीरंग महाजनने साकारलेली ज्ञानेशची भूमिका अनेकांना भावली.त्याने साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.4 / 7निरागस चेहऱ्याचा हा बालकलाकार आता सध्या कुठे आहे, काय करतो? याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना उत्सुकता आहे.5 / 7'एलिझाबेथ एकादशी' मधील हा बालकलाकार आता मोठा झाला असून त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. 6 / 7श्रीरंग महाजन 'एलिझाबेथ एकादशी'नंतर कलाविश्वातून गायब झाला. सध्या तो पुण्यात जॉब करतो.7 / 7पुण्यातच श्रीरंगने कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. सध्या तो कलाविश्वापासून दूर आपल्या पद्धतीने आयुष्य जगतो आहे. नुकतीच त्याने कलाकृती मीडियाला मुलाखत दिली त्यामध्ये त्याच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे.