1 / 7मराठीसोबत हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहा अनेक गोष्टीमुळे सतत चर्चेत येत असते. 2 / 7मराठीबरोबरच हिंदी कलाविश्वदेखील गाजवणारी नेहा पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकली आहे.3 / 7नेहा कान्समध्ये पहिल्यांदाच गेली असून तिने या फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. कान्समधील नेहाचा रेड कार्पेट लूकही समोर आला आहे.4 / 7ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये समुद्रकिनारी नेहाने खास फोटोशूट केलंय. कान्समध्ये मराठमोळ्या नेहाने खऱ्या अर्थाने रेड कार्पेट गाजवलं आहे.5 / 7नेहाचा हा पहिला कान्स लूक असून ती अजून दोन वेगवेगळ्या आणि तितक्याच आकर्षक लूक्समध्ये दिसणार आहे.6 / 7नेहाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलचा लूक समोर येताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेहाचा ग्लॅमरस लूक सर्वांना आवडलेला दिसतोय7 / 7नेहाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर गेल्या काही वर्षांमध्ये मराठीसोबत हिंदी इंडस्ट्रीतही स्वतःची छाप पाडली. कान्समध्ये पहिल्यांदाच झळकण्याची संधी मिळालेली नेहा तिच्या खास लूकने रेड कार्पेट गाजवेल यात शंका नाही.