old memories: प्रार्थना बेहरेच्या लग्नाचा अल्बम कधी पाहिलाय का? बॉलिवूड स्टारप्रमाणेच दिसतो तिचा नवरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:56 IST
1 / 10मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. आपल्या अभिनयासह सौंदर्याच्या जोरावर प्रार्थनाने असंख्य तरुणांच्या मनावर राज्य केलं. 2 / 10'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'वॉट्सॲप लग्न' या आणि अशा असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेली प्रार्थना सध्या एका मालिकेत काम करत आहे.3 / 10'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची भर पडली आहे.4 / 10सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या प्रार्थनाविषयी दररोज असंख्य गोष्टी चर्चिल्या जात असतात. यामध्येच सध्या तिच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल होत आहेत.5 / 10प्रार्थनाने अरेंज मॅरेंज केलं असून १४ नोव्हेंबर २०१७ मध्ये तिने मोठ्या थाटात अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली.6 / 10गोव्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडल्याचं म्हटलं जातं.7 / 10अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्मातादेखील आहे.8 / 10मराठमोळ्या पद्धतीने प्रार्थना- अभिषेकचा विवाहसोहळा रंगला.9 / 10जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांच्या साक्षीने प्रार्थना-अभिषेकने साताजन्माची गाठ बांधली.10 / 10या लग्नात प्रार्थनाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर निळ्या रंगाचा शेला घेतला होता. तर, अभिषेकने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता परिधान केला होता.