Join us

'पिंजरा' फेम अभिनेत्री सारा श्रवण आठवतेय का? अनेक वर्षांपासून सिनेविश्वापासून आहे दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:41 IST

1 / 8
'पिंजरा', 'देवयानी',' भाग्यलक्ष्मी', 'तू तिथे मी' या मालिकांमध्ये दिसलेली सारा श्रवण (Sara Shrawan) आठवतेय का? मालिकांमधील तिच्या नकारात्मक भूमिका खूप गाजल्या.
2 / 8
२०११ साली 'जळू बाई हळू' या व्यावसायिक नाटकातून पदार्पण केलं. नंतर ती झी मराठीवरील मालिकांमधून भेटीला आली.
3 / 8
'एकापेक्षा एक अप्सरा आली' मध्ये तिने आपल्या नृत्याची झलक दाखवली. 'यारो की यारी', 'मुंगळा' या आयटम साँगमधून ती प्रसिद्धीझोतात आली होती.
4 / 8
'लक्ष्य', 'गं साजणी', 'एक मोहोर अबोली', 'गंध फुलाचा गेला सांगून', 'माझिया माहेरा', 'रंग हे प्रेमाचे रंगीले' या मालिकांमध्ये झळकली. जेंटलमन, व्हॉट अबाऊट सावरकर, शिकारी , निवडुंग या सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारली.
5 / 8
२०१४ मध्ये सारा बालमित्र गणेश सोनावणेसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर ती दुबईत स्थायिक झाली. तिला आरुष हा गोंडस मुलगाही आहे.
6 / 8
२०१९ मध्ये साराला खंडणी प्रकरणात अटकही झाली होती. रोल नंबर १८ सिनेमातील एका अभिनेत्याविरोधात त्याच सिनेमातील अभिनेत्रीने विनयभंगाची खोटी तक्रार केली. यात सारानेबी अभिनेत्रीची मदत केली. दोघींनी अभिनेत्याला खंडणीसाठी ब्लॅकमेल केले होते. यानंतर काही दिवसात तिला जामीनही मिळाला होता.
7 / 8
सारा सध्या दुबईतच स्थायिक आहे. नवरा आणि मुलासह ती फोटो पोस्ट करत असते. आता ती सिनेसृष्टीपासून दूर संसारात रमली आहे.
8 / 8
साराने हास्यजत्रेच्या कलाकारांसोबतही फोटो शेअर केले होते. हास्यजत्रेची टीम दुबई दौऱ्यावर असताना साराने त्यांची भेट घेतली होती.
टॅग्स :सारा श्रवणमराठी अभिनेतादुबईटेलिव्हिजनमराठी चित्रपट