Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य

By देवेंद्र जाधव | Updated: June 16, 2025 17:18 IST

1 / 7
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ताने एका मुलाखतीत फिटनेस आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे
2 / 7
प्राजक्ता माळीने अभिनेत्री सोनाली खरेसोबत दिलेल्या मुलाखतीत याविषयी उलगडा केला होता. प्राजक्ताने यावेळी तिचा दैनंदिन दिनक्रम सांगितला. जो अतिशय सोपा असून सर्वांना फॉलो करता येईल असा आहे.
3 / 7
प्राजक्ता माळी म्हणते की, उठल्या उठल्या सकाळी दहाच्या आत नाश्ता झाला पाहिजे. दुपारी १ वाजायच्या आत जेवण झालं पाहिजे. याशिवाय संध्याकाळी सुर्यास्ताच्या आत तुमचा डिनर झाला पाहिजे, हे मी पाळते
4 / 7
उठल्या उठल्या पहिल्यांदा रिकाम्या पोटी दोन ग्लास गरम किंवा कोमट पाणी प्राजक्ता पिते. त्यानंतर प्राजक्ता एक फळ आणि मग नाश्ता हे रुटिन फॉलो करते.
5 / 7
प्राजक्ता कोणतंही कोल्ड ड्रिंक्स पित नाही. कोल्ड ड्रिंक्सऐवजी कोकम सरबत किंवा ताक पिण्यास प्राजक्ता प्राधान्य देते. प्राजक्ता रोज जमेल तसं ताक पिऊन स्वतःला फिट ठेवते.
6 / 7
प्राजक्ता सर्व पदार्थ खाते. खाण्याच्या बाबतीत ती कोणतेही नखरे करत नाही. याशिवाय प्राजक्ता म्हणते की, आपले आजी-आजोबा जसे जगायचे ना तुम्ही तशी लाइफस्टाईल फॉलो करा, आपण खूप त्याची माती केली आहे.
7 / 7
'आजी-आजोबा कसं जगायचे. ते काय खायचे, ते किती वाजता झोपायचे, ते सगळं करा. म्हणजे डोक्याला तेल लावण्यापासून ते सुती कपडे वापरण्यापर्यंत त्यांच्या गोष्टी योग्य होत्या. आपण मात्र आता माती खातो', अशा पद्धतीने प्राजक्ता माळीने खुलासा केला.
टॅग्स :प्राजक्ता माळीफिटनेस टिप्सब्यूटी टिप्समहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतामराठी चित्रपट