Join us

समीर चौघुलेंनी केलंय हेअर ट्रान्सप्लांट, खर्च केलेत लाखो रुपये, म्हणाले- "लोकांना निदान माझ्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:24 IST

1 / 9
अभिनयाला विनोदाची झालर लावत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील स्टार अभिनेता समीर चौघुलेंचा आज वाढदिवस आहे.
2 / 9
प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे समीर चौघुले प्रेक्षकांना त्यांच्या घरातलेच वाटतात.
3 / 9
कमी वयातच समीर चौघुलेंच्या डोक्यावरचे केस गेले. यावरुनही ते अनेकदा विनोदनिर्मिती करताना दिसतात.
4 / 9
एकदा चाहत्याने समीर चौघुलेंना थेट त्यांच्या हेअर ट्रान्सप्लांटवरुन प्रश्न विचारला होता. 'हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला?' असा प्रश्न या चाहत्याने विचारला.
5 / 9
मात्र, समीर चौघुलेंनी हा प्रश्न पॉझिटिव्हरित्या घेत या चाहत्याला प्रामाणिकपणे उत्तर दिलं होतं.
6 / 9
'हा खरंच तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारला आहे. लोकांच्या मनात मी पॉझिटिव्हीटी निर्माण करतोय'.
7 / 9
'लोकांना निदान माझ्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करावंस वाटतं हादेखील एक पॉझिटिव्ह भाग आहे'.
8 / 9
'आता माझी काय हेअर ट्रान्सप्लांट करण्याची एजन्सी नाही. त्यामुळे मी काही ठराविक रक्कम सांगू शकत नाही. पण, मला साधारणपणे ३ लाखांपर्यंत खर्च आला'.
9 / 9
'आता सध्या हेअर ट्रान्सप्लांट करणं स्वस्त झालं आहे. पण, आताची किंमत मला माहित नाही', असं समीर चौघुले म्हणाले होते.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासमीर चौगुलेटिव्ही कलाकार