BSF ची नोकरी सोडून 'महाभारतात' भीम बनले होते Praveen Kumar, आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले होते गोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:40 IST
1 / 9Mahabharat Bheem Pravin Kumar Death:बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ (Mahabharat) या अभूतपूर्व गाजलेल्या मालिकेत भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.2 / 9करिश्मा कुदरत का, युद्ध, जबरदस्त, सिंहासन,खुदगर्ज, लोहा, मोहब्बत के दुश्मन, इलाका आणि इतर अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहे. पण त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेने.3 / 96 डिसेंबर 1947 रोजी जन्मलेल्या प्रवीण कुमार सोबती यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी 4 पदके जिंकली आहेत. यामध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.4 / 9या खेळामुळेच प्रवीण कुमार यांना सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) डेप्युटी कमांडंटची नोकरी मिळाली, पण नशिबात वेगळेच लिहिले होते. 1986 मध्ये एक मित्र प्रवीण यांच्याकडे आला आणि त्याने सांगितले की बीआर चोप्रा महाभारत बनवत आहेत आणि तो भीमच्या भूमिकेसाठी एक पराक्रमी व्यक्ती शोधत आहे आणि त्यांना तुम्ही एकदा येऊन भेटावे अशी त्यांची इच्छा आहे.5 / 91981 मध्ये आलेल्या ‘रक्षा’ चित्रपटात प्रवीण यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’ चित्रपटात त्यांनी ‘मुख्तार सिंग’ची अफलातून भूमिका साकारली होती.6 / 9प्रवीण कुमार सोबती यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'शहेनशाह' या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. चित्रपटात, तो मुख्तार सिंगच्या भूमिकेत होता, ज्यांना अमिताभ म्हणतात - रिश्ते में तो तुम्हा बाप होते है नाम है शहेनशाह. प्रवीण यांनी चाचा चौधरी या मालिकेतही साबूची भूमिका साकारली आहे.7 / 91998 पर्यंत सतत चित्रपट आणि टीव्हीमध्ये सक्रिय राहिल्यानंतर, प्रवीण कुमार यांनी स्वतःला अभिनयापासून दूर केले. तब्बल 14 वर्षांनी 2012 मध्ये धर्मेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या भीम चित्रपटात ते दिसले होते. मात्र त्यानंतर अभिनयाला रामराम करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 8 / 9वजीरपूर मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.9 / 9त्यनंतर प्रवीण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.