Join us

'या'सिनेमानंतर अक्षयला घाबरु लागली करिश्मा; पुन्हा कधीही त्याच्यासोबत काम न करण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 09:08 IST

1 / 10
खिलाडी कुमार म्हणून बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. दीदार सिनेमातून करिअरला सुरुवात केलेल्या अक्षयच्या आयुष्यात असा एक टप्पा आला होता जेव्हा त्याचे सगळे सिनेमा फ्लॉप होत होते.
2 / 10
अक्षय कुमारचे सिनेमा फ्लॉप होत असताना अनेक कलाकारांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. यात एका लोकप्रिय अभिनेत्रीचाही समावेश आहे.
3 / 10
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अक्षयसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यामागे एक कारण असल्याचं सांगितलं जातं.
4 / 10
करिश्माकडे अनेक मोठ्या सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. मात्र, त्यात केवळ अक्षय आहे या एका कारणासाठी तिने या सिनेमाच्या ऑफर्स धुडकावल्या.
5 / 10
'दीदार'मध्ये अक्षयसोबत करिश्मा कपूर झळकली होती. परंतु, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. इतकंच नाही तर त्याचे लागोपाठ 'सपूत' आणि 'मैदान-ए-जंग', 'लहू के दो रंग' यांसारखे इतरही सिनेमा फारसे गाजले नाहीत.
6 / 10
लहू के दो रंग हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर करिश्माला अक्षयसोबत काम करण्यास भीती वाटू लागली. एकीकडे अक्षयचे सिनेमा फ्लॉप ठरत होते. तर, करिश्मा त्यावेळी टॉपची अभिनेत्री होती. त्यामुळे या परिस्थितीत अक्षयसोबत काम केल्यास आपलेही सिनेमा फ्लॉप होतील अशी तिला भीती होती.,
7 / 10
या एका भीतीपोटी तिने संघर्ष, हेराफेरी असे सुपरहिट सिनेमाही सोडले.
8 / 10
सध्या करिश्मा कलाविश्वापासून दूर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ती एकाही सिनेमात झळकलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
9 / 10
करिश्मा कपूर 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री राहिली आहे. त्या काळात तिनं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
10 / 10
ती बऱ्याच दिवसांपासून अभिनय जगतापासून दूर आहे आणि कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूडअक्षय कुमारसेलिब्रिटी