'कहो ना प्यार है' फेम बालकलाकाराने रिजेक्ट केली होती 'गदर'ची ऑफर; आता काय करतोय हा अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 15:07 IST
1 / 9बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा 'कहो ना प्यार हैं' हा सिनेमा कोणताही प्रेक्षकवर्ग विसरणार नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.2 / 9हा सिनेमा रिलीज होऊन जवळपास २४ वर्ष झाली आहेत. मात्र, त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. 3 / 9सध्या सोशल मीडियावर या सिनेमातील बालकलाकार म्हणजेच अभिनेता अभिषेक शर्मा याची चर्चा रंगली आहे.4 / 9अभिषेक शर्मा याने या सिनेमा हृतिकच्या लहान भावाची अमितची भूमिका साकारली होती.5 / 9या सिनेमानंतर अभिषेक काही मोजक्या सिनेमांमध्ये झळकला परंतु, त्यानंतर तो अचानकपणे इंडस्ट्रीतून गायब झाला.6 / 9अभिषेकने या सिनेमात काम करुन बरीच लोकप्रियता मिळवली. या सिनेमानंतर तो अन्य काही सिनेमांमध्येही झळकला. मात्र, त्यानंतर त्याचा रुपेरी पडद्यावरचा वावर कमी झाला.7 / 9सिनेमातील छोटा अमित आता मोठा झाला असून रुपेरी पडद्यापासून जरी तो दूर गेला असला तरीदेखील छोट्या पडद्यावर नशीब आजमावत आहे.8 / 9अभिषेकने सनी देओलच्या चॅम्पियन या सिनेमातही काम केलं होतं. इकतंच नाही तर त्याला गदर सिनेमाचीही ऑफर मिळाली होती. मात्र, त्याने ती धुडकावली.9 / 9सध्या अभिषेक छोट्या पडद्यावर त्याचं नशीब आजमावत आहे. ससुराल सिमर का, दिल मिल गए, दिल दिया गल्ला, हिरो गायब मोड ऑन आणि रम पम पो या मालिकांमध्ये तो झळकला होता.