अभिनेत्याचा १४ वर्षांचा संसार मोडला; आता 12 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:16 IST
1 / 7बॉलिवूडमध्ये लग्न, घटस्फोट या अगदी सामान्य गोष्टी आहेत. अनेक जोडप्यांनी त्यांचे १० -१५ वर्षांता संसार मोडला आहे. तर काही त्यांच्यापेक्षा १०-२० वर्षांनी लहान पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.2 / 7'ग्रीक गॉड' म्हणून ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचंही वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. हृतिक सध्या अभिनेत्री सबा आजादला डेट करत आहे.3 / 7काही दिवसांपासून हृतिक आणि सबा आजादच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या. पण याला पूर्णविराम देत काल दोघंही हातात हात घालून मूव्ही स्क्रीनिंगसाठी पोहोचले.4 / 7हृतिक रोशनने 2000 साली सुझैन खानसोबत लग्न केलं होतं. हे लव्ह मॅरेज होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. मात्र लग्नानंतर तब्बल १४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. 5 / 7घटस्फोटानंतर काही दिवसातच हृतिक सबासोबत रिलेशनशिपमध्ये आला. तर सुझैन खान अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आली. त्यामुळे दोघंही चांगलेच ट्रोल झाले.6 / 7सबा आजाद हृतिकपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. अनेकदा तिला हृतिकच्या कुटुंबासोबतही वेळ घालवताना बघितले गेले आहे. तसंच दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्याही चर्चा आहेत. 7 / 7हृतिक आगामी 'वॉर 2' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे हृतिकसोबत डेटिंग करत असल्याने सबा आजादच्या हातून तिचं व्हॉइस ओवरचं काम केलं गेलंय. याविरोधात तिने सोशल मीडियावर आवाज उठवला होता.