Join us

"हास्यजत्रेत माझा कोणीही मित्र नाही", गौरव मोरेचा खुलासा; मांडलं इंडस्ट्रीतलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:11 IST

1 / 9
गौरव मोरे (Gaurav More) म्हटलं की 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' डोळ्यासमोर येते. या कार्यक्रमामुळे गौरवचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. त्याची बोलण्याची युनिक स्टाईल, हेअरस्टाईल सगळंच गाजलं.
2 / 9
गौरव मोरे आता 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात दिसणार आहे. त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
3 / 9
नुकतंच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत गौरवने इंडस्ट्रीतलं राजकारण, मैत्री यावर भाष्य केलं. तेव्हा हास्यजत्रेत आपला कोणीही मित्र नाही असाही त्याने खुलासा केला.
4 / 9
गौरव मोरे म्हणाला, 'हास्यजत्रेत माझा कोणी मित्र नाही. मी इंडस्ट्रीत कोणासोबत जास्त मैत्री करत नाही. शर्यतीत धावणारा प्रत्येक जण हा तुमचा स्पर्धक आहे. तुमचा मित्र नाही. म्हणून मी जरा कमी मैत्री करतो.'
5 / 9
'मला काही अनुभव आलेत म्हणूनच मी असं सांगतोय. मला खूप उशिरा कळलं की अरे आपण इतके मित्र नाही तर सगळे एकमेकांचे स्पर्धकच आहोत.'
6 / 9
'तसं बघायला गेलं तर माझा मित्र निखिल चव्हाण. त्याच्याबरोबर मी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. कारण तो मला जवळचा वाटतो. राकेश शशी हेही माझे जुने मित्र आहेत. विशाल देवरुखकर आहेत. अभिनय बेर्डेही आहे. असे तीन चार जणांसोबतच मी जास्त संपर्कात आहे.'
7 / 9
'मी इंडस्ट्रीतल्या राजकारणाकडे नेहमी दुर्लक्ष करत आलो आहे. माझ्यासोबत कधी असं झालेलंही नाही. आपण आपलं काम करावं एवढं मला वाटतं. बाकी या गोष्टी दुय्यम आहेत. त्याला किंमत देण्यात अर्थ नाही.'
8 / 9
'अपमानास्पद वागणूक मिळाली, इग्रोर झालो असंही कधी झालं नाही. माझ्यासमोर तरी नाही. पण उद्या असं झालं तर मीही त्या व्यक्तीला सोडणार नाही. कायमचा इग्नोर करेन हे नक्की.'
9 / 9
'मी जेवढा चांगला आहे तेवढा वाईटही आहे. मी खूप देतो पण मला जर लोकांनी गृहित धरलं तर मग मी ते तिथेच थांबवतो. आणि बॅकफूटला जातो. मधल्या दीड दोन वर्षात असे अनुभव आले आता त्याची सवय झाली.'
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राचला हवा येऊ द्याटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेता