Join us

केळीच्या पानांची सजावट अन् सुंदर मूर्ती, लग्नानंतर रेश्मा शिंदेने घरी आणले गणपती बाप्पा, शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:04 IST

1 / 7
बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे वातावरण मंगलमय झालं आहे. दरवर्षी सेलिब्रिटींच्या घरीही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो.
2 / 7
यंदा अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या घरीही गणरायाचं आगमन झालं आहे. लग्नानंतर रेश्मा शिंदेचा हा पहिला गणेशोत्सव आहे.
3 / 7
रेश्माने पती पवनसोबत गणरायाची पूजा करत बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशोत्सवाचे खास फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
4 / 7
गणपती बाप्पासाठी रेश्माने खास केळीच्या पानांची आरास केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
5 / 7
'लग्नानंतरचा पहिला बाप्पा..पहिलं पावन आगमन– आनंद, श्रद्धा आणि नव्या सुरुवातीचा मंगलमय क्षण! मोरया', असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.
6 / 7
रेश्माने गणेशोत्सवासाठी खास पारंपरिक लूक केला होता. साडी नेसून रेश्मा खास तयार झाली होती.
7 / 7
लग्नानंतर पहिल्यांदाच रेश्माने घरी गणरायाची स्थापना करत गणेशोत्सव साजरा केला आहे.
टॅग्स :गणेशोत्सवसेलिब्रिटी गणेशरेश्मा शिंदेटिव्ही कलाकार