Join us

युद्धादरम्यान, युक्रेनहून भारतात आलेल्या तरुणीसोबत प्रसिद्ध गायिकेच्या भावाने केलं लग्न, पाहा कोण आहे ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:50 IST

1 / 7
प्रसिद्ध गायिका नेहा भसीन हिचा भाऊ अनुभव भसीनने हल्लीच लग्न केलं आहे. हे लग्न खूप खास ठरलं आहे कारण या लग्नातीव वधू अॅना होरोडेट्स्का युक्रेन युद्धादरम्यान भारताता आली आहो. आता या विवाहाचे फोटो प्रसामाध्यमांसमोर आले आहेत.
2 / 7
अनुभव भसीनने युक्रेनमधील राहणाऱ्या अॅना होरोडेट्स्का हिच्यासोबत विवाह केला आहे.
3 / 7
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अॅना गेल्या १७ मार्च रोजी युक्रेन सोडून भारतात आली होती. युद्धादरम्यान, ती किवमध्ये होती. अॅना आणि अनुभव २०१७ पासून एकमेकांना डेट करत होते.
4 / 7
आता या युद्धादरम्यान दोघांनीही भारतामध्येच आपल्या नात्याला विवाहामध्ये रूपांतरीत केले आहे. त्यांचा विवाहसोहळा दक्षिण दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला.
5 / 7
आता अनुभवने त्याच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही खूशखबर आपल्या फॅन्सना दिली.
6 / 7
त्याबरोबरच अनुभवने एक संदेशही लिहिला आहे, जेव्हापासून आम्ही भेटलो तेव्हापासूनच आमचा प्रवास खूप अविस्मरणीय राहिला आहे. मात्र या काळात आम्ही अनेक अडचणी आणि संकटांचाही सामना केला. मी तुझ्यासोबत आपल्या जीवनाची एक नवी सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. माझ्या घरात तुझं स्वागत आहे.
7 / 7
दोघांनाही आता या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा मिळत आहेत. तसेच या कठीण काळात अॅनाला साथ देण्यासाठी अनुभवचं खूप कौतुक करत आहेत.
टॅग्स :बॉलिवूडनेहा भसीनयुक्रेन आणि रशियालग्न