Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' खेळाडूची पत्नी होती चित्रांगदा सिंह, १३ वर्षांनंतर झाला घटस्फोट; एकटीनेच केला लेकाचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:12 IST

1 / 8
'देसी बॉइज','हजारो ख्वाहिशे ऐसी' या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh). नुकतीच ती 'खाकी: द बंगाल चॅप्टर' मध्येही दिसली.
2 / 8
चित्रांगदा बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. आताच रिलीज झालेल्या 'हाऊसफुल ५' मध्येही तिची भूमिका आहे.
3 / 8
चित्रांगदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी जणांना माहित आहे. जवळपास ७ वर्ष ती पडद्यावरुन गायब होती. आता तिने नुकतंच आयुष्यातील त्या टप्प्यावर भाष्य केलं.
4 / 8
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत चित्रांगदा म्हणाली, 'वैयक्तिक आयुष्यासाठी मी करिअरकडे दुर्लक्ष केलं. माझं लग्न झालं होतं, मला एक मुलगा होता. पण म्हणून मला कास्ट करु शकत नाही असं कोणीही म्हणालं नव्हतं.'
5 / 8
'उलट माझ्यकडे अनेक चांगल्या भूमिकांच्या ऑफर्स होत्या. मात्र मी चुकीचे निर्णय घेतले. 'गँगस्टर','तनू वेड्स मनू' आणि 'मंगल पांडे' ही ऑफर झाला होता. पण मी या सर्व सिनेमांना नकार दिला.'
6 / 8
'मला काही जणांनी चुकीचे सल्ले दिले. यामुळे करिअरमध्ये मी चुकीचे निर्णय घेतले. पण यासाठी मी कोणालाही दोष देत नाही. मी विवाहित आहे आणि मला ७ वर्षांचा मुलगा आहे यामुळे कोणीच मला ऑफर देणं कमी केलं नव्हतं. पण मी लेकाच्या जन्मानंतर ७ वर्षांचा ब्रेक घेतला.'
7 / 8
'मी आई झाल्यानंतरच 'देसी बॉइज', 'इनकार', 'साहेब बीवी और गँगस्टर' हे सिनेमे केले. त्यामुळे माझ्या करिअरवर याचा परिणाम झाला नव्हता.'
8 / 8
चित्रांगदाने २००१ साली गोल्फ खेळाडून ज्योती रंधावासोबत लग्न केलं होतं. २००८ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव झोरावर आहे. १३ वर्षांनंतर २०१४ साली त्यांचा घटस्फोट झाला. झोरावरची कस्टडी चित्रांगदाला मिळाली.
टॅग्स :चित्रांगदा सिंगबॉलिवूडघटस्फोट