दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास
By कोमल खांबे | Updated: February 20, 2025 18:09 IST
1 / 10सध्या छावा सिनेमाने अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून विकी कौशलने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. 2 / 10पण, विकी कौशलबरोबरच आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं...3 / 10छावा आधी लक्ष्मण उतेकर यांनी मिमी, लुका छुपी, जरा हटके जरा बचके, तेरी बातों मे ऐसा उलझा जिया, इंग्लिश विंग्लिश, लालबागची राणी या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 4 / 10पण,छावामुळे नावारुपाला आलेल्या लक्ष्मण उतेकर यांचा बॉलिवूड दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. 5 / 10त्यांनी बॉलिवूडमध्ये स्पॉटबॉय पासून काम करायला सुरुवात केली होती. त्याआधी अशोक जैन यांच्या फिल्म स्टुडियोमध्ये ते सफाई कामगार म्हणून काम करत होते. 6 / 10दहावीत दोनदा नापास झाल्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी शाळा सोडून छोटी मोठी कामं करून पैसे कमवायला सुरुवात केली. 7 / 10सुरुवातीला ठाकरेंच्या सभेत ते पॉपकॉर्न विकायचे. नंतर शिवाजी पार्कातच त्यांनी वडापावची गाडी टाकली होती. 8 / 10त्यानंतर वर्तमानपत्रात सफाई कामगाराची जाहिरात पाहून त्यांनी अशोक जैन यांच्या फिल्म स्टुडियोमध्ये काम करायला सुरुवात केली. 9 / 10इथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. काही काळ स्पॉटबॉय म्हणून काम केल्यानंतर लक्ष्मण उतेकर असिस्टंट डिओपी झाले. 10 / 10त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. डिओपी झाल्यानंतर आता ते बॉलिवूडमधील एक उत्तम दिग्दर्शक आहेत.