Join us

"पिझ्झा, बर्गर खाऊनही माझं वजन वाढायचं नाही कारण..", अभिनेत्याचा आश्चर्यजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:58 IST

1 / 7
हा अभिनेता जीममध्ये कसून व्यायाम करायचा. अनेकजण जीममध्ये वजन कमी करण्यासाठी पण या अभिनेत्याने वजन वाढण्यासाठी जीम लावली होती.
2 / 7
या अभिनेत्याचं नाव आहे विकी कौशल. विकी कौशल त्याच्या एका सिनेमानिमित्त जेव्हा केबीसीमध्ये सहभागी झाला होता, तेव्हा त्याने हा खुलासा केला होता.
3 / 7
काहीही खाऊन विकीचं वजन वाढत नाही. इतकंच नव्हे पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड खाऊनही विकीचं वजन 'जैसे थे'च असतं.
4 / 7
त्यामुळे वजन वाढवण्यासाठी विकीला जीम लावावी लागते. वजन वाढवण्यासाठी मग विकी वाफवलेल्या भाज्या आणि कंटाळवाणे पदार्थ खायचा. अशाप्रकारे विकीचं शरीर त्याला उलट्या पद्धतीने साथ देत असल्याचा गंंमतीशीर खुलासा त्याने केला.
5 / 7
'काहीही खाऊन वजन न वाढणं ही पंजाबींसाठी चांगली गोष्ट आहे', असं विकी केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांना म्हणाला होता
6 / 7
विकीने नुकतंच 'छावा' या सिनेमात अभिनय केला. या सिनेमात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती
7 / 7
'छावा' सिनेमाने जगभरात ७०० कोटींहून जास्त कमाई केली. या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून 'छावा' सिनेमाकडे पाहिलं जातंय.
टॅग्स :विकी कौशल'छावा' चित्रपटफिटनेस टिप्स