जगभरातील टॉप १० देखण्या पुरुषांची यादी जाहीर, त्यामध्ये केवळ एकमेव भारतीयाचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:41 IST
1 / 11Top 10 Most Handsome Men In The World: टेक्नो स्पोर्ट्सने जारी केलेल्या या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे BTS सदस्य V (BTS V (Kim Taehyung)). किम ताई-ह्युंग हा एक दक्षिण कोरियन गायक, अभिनेता आणि गीतकार आहे आणि दक्षिण कोरियन बॉय ग्रुप बीटीएसचा सदस्य आहे. त्याला संपुर्ण जग V या नावाने ओळखतं. 2 / 11ब्रॅड पिट (Brad Pitt) हा एक अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. ६१ वर्षीय असेलला हा अभिनेता आजही तरुणींना भुरळ घालतो. त्याचा फिटनेस कमालीचा आहे. अभिनेत्याची कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळाची आहे. त्याने दोन अकादमी पुरस्कार जिंकले आहेत. त्याला दोनदा 'पीपल्स सेक्सीएस्ट मॅन अलाइव्ह' हा किताब मिळालेला आहे. त्यानं जगातील सर्वात सुंदर महिला जेनिफर ॲनिस्टनशी लग्न केलं. त्यानंतर तिच्यपासून वेगळं होत २०१४ मध्ये अँजेलिना जोलीशी लग्न केले आणि दोन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. वय झाले असूनही तो आजही तितकाच देखणा दिसतो .3 / 11रॉबर्ट पॅटिन्सन (Robert Pattinson) हा जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. लंडनमध्ये जन्मलेल्या रॉबर्टने वयाच्या १५ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती. 4 / 11नोआ मिल्स (Noah Mills) हा एक कॅनेडियन मॉडेल आणि अभिनेता आहे, ज्याने फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 5 / 11या यादीत आपल्या भारतातले एक नाव आहे, हे पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. तो अभिनेता आहे हृतिक रोशन. बॉलिवूड अभिनेत्यानं पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. जगभरात हृतिक रोशनचा मोठा चाहतावर्ग आहे. बॉलीवूडमध्ये हृतिक हा सर्वात हॅन्डसम आणि सुंदर दिसणारा अभिनेता आहे.6 / 11भारतातच नव्हे तर ऋतिकचा स्टारडम परदेशात देखील आहे. हृतिक 'कहो ना प्यार है' या पहिल्या चित्रपटापासून लाखो प्रेक्षकांत्या हृदयात बसला. 7 / 11जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे २३ वे पंतप्रधान आहेत. त्याने मॅकगिल विद्यापीठ आणि ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून अभिनयाचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांची राजकीय कारकीर्द २००८ मध्ये सुरू झाली. ते कॅनडाच्या इतिहासातील दुसरे सर्वात तरुण पंतप्रधान बनले होते. 8 / 11क्रिस्टोफर रॉबर्ट इव्हान्स (Chris Evans) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. ज्याचा जन्म १९८१ मध्ये झाला. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्हीवरून केली होती. आज तो जगभरात प्रसिद्ध आहे. कॅप्टन अमेरिका म्हणूनही तो ओळखला जातो. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपटांच्या माध्यमातून तो जगभरात पोहोचला. 9 / 11हेन्री कॅव्हिल (Henry Cavill) हा एक ब्रिटिश अभिनेता आहे. . हेन्री कॅव्हिल (Henry Cavill) या ब्रिटीश अभिनेत्याने या चित्रपटामध्ये सुपरमॅनचे पात्र साकारले होते. तो या चित्रपटाव्यतिरिक्त डीसीईयूच्या ‘बॅटमॅन व्हर्सस सुपरमॅन’ (Batman vs superman), ‘जस्टिस लीग’ (Justice league) आणि ‘जस्टिस लीग स्नायडर कट’ (Justice league snyder cut) या चित्रपटांमध्ये झळकला आहे.10 / 11अमेरिकेन अभिनेता टॉम क्रूझ (Tom Cruise) हा तर जगभरातील मुलींच्या गळ्यातल्या ताईत आहे. तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे मोहक हास्य आणि अभिनय पाहून जगभरातल्या तरुणी त्याच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. तो गेल्या अनेक दशकांपासून काम करत आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.11 / 11ब्रॅडली कूपर (Bradley Cooper) हा अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. एक बाफ्टा आणि तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. ऑस्कर पुरस्कारांसाठी त्याला १२ नामांकने मिळाली आहेत. तो जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.