दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:51 IST
1 / 11बॉलिवूडची हॉट अँड फिट अभिनेत्री दिशा पाटनी आणि गायक तलविंदर सिंग एकमेकांना डेट करत असल्याची सध्या इंटरनेटवर चर्चा सुरु आहे.2 / 11या चर्चा सुरु असतानाच आता बॉलिवूडची लोकप्रिय आयटम गर्ल नोरा फातेहीदेखील डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.3 / 11नोरा फातेही हिचे नाव मोरोक्कोच्या अशरफ हकीमीशी याच्याशी जोडले जात आहे. जाणून घेऊया, कोण आहे चर्चेत आलेला अशरफ हकीमी....4 / 11अशरफ हकीमी हा मोरोक्कन फुटबॉलपटू आहे. नोरा फतेही आफ्रिकन कप ऑफ नेशन्स स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी गेली होती, तेव्हा ही चर्चा रंगली.5 / 11अशरफ हकीमी हा जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. तो सध्या पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि मोरोक्कन राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळतो.6 / 11गेल्या वर्षी UEFA लीग विजेत्या पीएसजी संघाचा हकीमी एक महत्त्वाचा भाग होता. त्याआधी तो इंटर मिलान आणि रिअल माद्रिद सारख्या प्रमुख क्लबसाठी खेळला.7 / 11स्पेनमधील माद्रिद येथे जन्मलेल्या हकिमीने रिअल माद्रिद अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि आपल्या कामगिरीने त्याने जगातील अव्वल फुटबॉलपटूंच्या यादीत स्थान मिळवले.8 / 11अशरफ हा घटस्फोटित आहे. त्याचे लग्न स्पॅनिश अभिनेत्री हिबा अबुकशी झाले होते. २०२० मध्ये झालेले त्यांचे लग्न २०२३ मध्ये मोडले. या दोघांना दोन मुले आहेत.9 / 1110 / 1111 / 11