Join us  

सीनवेळी रागात खरोखर सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता, सेटवर उडाली होती खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 3:48 PM

1 / 8
कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नाही. आजही कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. अशात आता बॉलिवूड सेलिब्रिटी हळूहळू कामावर परतत आहेत. तसेच सेलिब्रिटींशी संबंधित अनेक किस्से, थ्रोबॅक फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत आहेत. अशातच सनी देओल आणि अनिल कपूरचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा किस्सा दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा आहे. आजही दोघे एकमेकांना बघणं पसंत करत नाहीत.
2 / 8
सनी देओल आणि अनिल कपूर दोघांच्या फॅन्सची कमतरता नाही. दोघेही आपापली फॅन फॉलोईंग एन्जॉय करतात. पण कमीच लोकांना माहीत आहे की, दोघांचं जराही पटत नाही.
3 / 8
काही सिनेमात एकत्र काम केलेला सनी देओल आणि अनिल कपूर यांच्यात एक भांडण झालं होतं. अनिल कपूरला सनी देओलच्या रागाचं शिकार व्हावं लागलं होतं.
4 / 8
१९८९ मध्ये आलेल्या 'जोशीले' सिनेमात सनी आणि अनिलने एकत्र काम केलं होतं. याचं सिनेमाचं दिग्दर्शन सिब्ते हसन रिझवीने केलं होतं. या सिनेमाच्या फिल्म क्रेडीटमध्ये अनिलचं नाव सनीच्या नावाआधी आल्याने त्याचा ईगो हर्ट झाला होता. सनी देओल या कारणाने अपसेट होता. आणि याची खबर मीडियापर्यंत पोहोचली होती. पण हे प्रकरण कसंतरी शांत झालं होतं.
5 / 8
याचदरम्यान दोन्ही अभिनेत्याने एक सिनेमा एकत्र साइन केला. यात अनिल कपूर, श्रीदेवी आणि सनी देओल होता. सनी शूटवर अनिलसोबत बोलला नाही. त्याला तो टाळत होता. दोघांचंही काही खास पटत नव्हतं.
6 / 8
या सिनेमात दोघांचा एक फाइट सीन होता. यात सनीला अनिलचा गळा पकडायचा होता. असे म्हणतात की, सनीला या शूटदरम्यान जुनी गोष्ट आठवली आणि त्याचा पारा चढला. रागात सनीने खरंच अनिलचा गळा पकडला आणि जोरात दाबू लागला होता. अनिल श्वासही घेऊ शकत नव्हता. डायरेक्टरने कट बोलल्यावरही सनीने अनिलला सोडलं नव्हतं. अशात अनिलला वाचवण्यासाठी क्रू मेंबर्सना यावं लागलं होतं.
7 / 8
या घटनेनंतर अनिल फार घाबरलेला होता आणि त्याने याबाबत मीडियासोबत चर्चाही केली होती. त्याने सनीबाबत निराशा व्यक्त केली होती.
8 / 8
ही घटना व्हायला अनेक वर्षे झाली आहेत. पण दोघांचं नातं अजूनही चांगलं नाही. काहीही झालं तरी सनी देओल आणि अनिल कपूर एकमेकांशी बोलत नाहीत.
टॅग्स :अनिल कपूरसनी देओलबॉलिवूड