Join us

The Kashmir Files: कपिल शर्माचा प्रश्न विचारताच दिग्दर्शक अग्निहोत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:48 IST

1 / 9
द कपिल शर्मा शो बऱ्याच काळापासून लोकांचे मनोरंजन करत आहे आणि जगभरात लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. परंतु अनेकदा या शो ला ट्रोलही करण्यात आलंय. आता पुन्हा एकदा हा शो लोकांच्या निशाण्यावर आहे.
2 / 9
कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) वादांशी घनिष्ठ संबंध आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्व काही ठीक चाललं असतानाही अचानक कपिल कोणत्या ना कोणत्या कारणानं वादाच्या भोवऱ्यात सापडतो.
3 / 9
सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला प्रमोशनसाठी कपिल शर्माने बोलावले नाही, त्यावरुन तो सध्या नेटीझन्सच्या निशाण्यावर आहे.
4 / 9
'आपल्या या चित्रपटात कोणताही बडा कलाकार नसल्यामुळे कपिल शर्मानं आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिल्याचं विवेक अग्निहोत्रींनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानंतर, लोकांनीही विवेक अग्निहोत्री यांच्या या आरोपाला गंभीरतेनं घेतलं.
5 / 9
विवेक अग्नीहोत्रींच्या या आरोपानंतर अनेकांनी मिथुन चक्रवर्ती आणि अनुपर खरे हे बडे कलाकार नाहीत का, असा सवाल करत कपिल शर्माला नेटीझन्सने सुनावलं.
6 / 9
विवेक अग्नीहोत्रींनी आज तक वाहिनीशी बोलताना पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शोचा मुद्दा पुढे आला. यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर विवेक यांनी, आपण हा प्रश्न कपिल शर्माला विचारावा, असं उत्तर दिलं.
7 / 9
'कपिल शर्मा शो मध्ये कोणाला बोलावलं पाहिजे याचा निर्णय मी घेऊ शकत नाही. हा पूर्णपणे कपिल शर्मा शो च्या प्रोड्युसर्सवर अवलंबून आहे,' असं विवक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्येही म्हटलं होतं
8 / 9
तसेच त्यांनी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महात्मा गांधींनी सांगितलेल्या वक्तव्याचा उल्लेखही केला होता. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कपिल शर्मावर निशाणा साधला.
9 / 9
विवेक अग्निहोत्री यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला समर्थन केलं. याशिवाय अनेकांनी कपिल शर्मावर टीकाही केली. असं आम्हाला कपिल शर्माकडून अपेक्षा नव्हती असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं.
टॅग्स :कपिल शर्मा सोशल मीडियाट्विटरबॉलिवूड