जान्हवी कपूरची जाऊबाई होणार 'ही' अभिनेत्री, कपलने खास फोटोशूटमधून कन्फर्म केलं नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:56 IST
1 / 7सध्या बीटाऊनमध्ये एक नवीन जोडी चर्चेत आहे. अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि वीर पहाडिया (Veer Paharia)एकमेकांना डेट करत असल्याची इतके दिवसांपासून चर्चा होती. आता गणेशोत्सवादरम्यान केलेल्या फोटोशूटमध्ये दोघांनी नातं जाहीर केलं आहे.2 / 7वीर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर पहाडियाचा तो लहान भाऊ आहे.3 / 7शिखर पहाडिया काही वर्षांपासून अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करत आहे. त्यामुळे आता जान्हवी कपूर तारा सुतारियाची जाऊबाई होणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.4 / 7सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. नुकतंच वीर आणि ताराने पारंपरिक पेहरावातील फोटो शेअर केले. पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये वीर हँडसम दिसत आहे.5 / 7तर ऑफ व्हाईट रंगाच्या लेहेंग्यात तारा सुतारिया सुंदर दिसत आहे. तिने केसात गजराही माळला आहे. शिवाय आकर्षक ज्वेलरी परिधान केली आहे.6 / 7दोघांनी आपापल्या पोस्टमध्ये एक फोटो असाही पोस्ट केला ज्यामुळे नातं कन्फर्म झालं. एकमेकांच्या मिठीत असलेला फोटो त्यांनी शेअर केला आहे. यासोबत अफेअरच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आहे. शिखरच्या पोस्टवर ताराने कमेंट करत 'माय लव्ह' असे लिहिले आहे. तर शिखरनेही ताराच्या पोस्टवर 'हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. . 7 / 7तारा सुतारिया आधी रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैनला डेट करत होती. मात्र नंतर आदरने ताराच्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न करत सर्वांना धक्का दिला. तारा आणि आदरचं ब्रेकअप चांगलंच चर्चेत होतं. आता तारा पुन्हा प्रेमात पडली आहे.