Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:43 IST
1 / 10काही महिन्यांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या स्वतःच्या घरात झालेल्या हल्ल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या हल्ल्यात सैफच्या पाठीच्या कण्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती. सुदैवाने तो आता पूर्णपणे बरा आहे, हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले होते. 2 / 10सैफने आता सांगितलं आहे की, या हल्ल्यामुळे तो स्वतः प्रचंड घाबरला होता. धक्कादायक घटनेबद्दल सैफने आपल्या भावना व्यक्त केल्या असून आपल्याला पुन्हा कधीच अंथरुणावरून उठता येणार नाही असं वाटलं असल्याचं देखील सांगितलं.3 / 10चाकूहल्ला आणि त्यातून सावरण्याचा भयावह अनुभव सैफने शेअर केला आहे. तो म्हणाला की, त्या वेळी तो खूप घाबरला होता, पण आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हता. त्या घटनेत तो कायमचा पॅरेलाइज देखील होऊ शकला असता.4 / 10'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'शी बोलताना सैफ म्हणाला, 'मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की, मी यातून वाचलो, कारण मृत्यू अगदी जवळ होता. माझ्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे पॅरेलाइज होऊ शकलो असतो.'5 / 10'काही काळ मला माझ्या पायात कोणतीही संवेदना जाणवत नव्हती. आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहण्याचा किंवा पॅरेलाइज होण्याचा विचार खूप भयानक आहे आणि आजही त्या विचाराने घाबरतो. मी आता पूर्णपणे ठणठणीत आहे.'6 / 10सैफ पुढे म्हणाला की, तो नेहमीच आपल्या आयुष्याला एक वरदान मानत आला आहे आणि या घटनेने त्याची ही विचारसरणी अधिक पक्की केली. 'आयुष्यातील प्रत्येक दिवस हे एक गिफ्ट आहे, असे मी नेहमीच मानतो. कदाचित या घटनेने ती जाणीव अधिक गडद केली आहे.'7 / 10यापूर्वी ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या 'टू मच' या चॅट शोमध्ये सैफने त्या रात्रीच्या संपूर्ण घटनेचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता, 'त्या रात्री करीना बाहेर गेली होती. मी मुलं (तैमूर आणि जेह) यांच्यासोबत चित्रपट पाहून दोनच्या सुमारास झोपलो होतो.'8 / 10'करीना आल्यावर थोडं बोलणं झाले आणि आम्ही पुन्हा झोपलो. तितक्यात मेड धावत आली आणि म्हणाली की, 'जेहच्या खोलीत कोणीतरी घुसलं आहे, त्याच्या हातात चाकू आहे आणि तो पैशांची मागणी करत आहे.''9 / 10सैफ हे ऐकताच तातडीने उठला आणि अंधारातच जेहच्या खोलीत शिरला. तिथे एक माणूस चाकू घेऊन जेहच्या बेडजवळ उभा होता. 'मी माझ्या प्रशिक्षणाचा वापर करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी माझ्या पाठीवर जोरदार वार झाला.'10 / 10'घरातील सर्वजण बाहेर आले होते. आमची मेड गीता हिने त्या माणसाला माझ्यापासून दूर ढकललं. तिने त्यावेळी माझा जीव वाचवला, कारण त्याने मला अनेक ठिकाणी जखमी केलं होतं. नंतर आम्ही त्याला एका खोलीत बंद केलं' असं अभिनेत्याने म्हटलं आहे.