Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राची देसाई वयाच्या ३६ व्या वर्षीही आहे अविवाहित, कारण सांगत म्हणाली, "नात्यात विश्वासघात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 14:46 IST

1 / 8
प्राचीने 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई', 'बोल बच्चन', 'रॉक ऑन', 'अजहर' अशा काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं. नुकतीच तिची 'सायलेन्स 2' ही सीरिज गाजली.
2 / 8
प्राचीचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. ती ३६ वर्षांची असूनही अद्याप अविवाहित आहे. प्राचीचं नाव रोहित शेट्टीसोबतही जोडलं गेलं होतं. बोल बच्चनच्या सेटवर त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. दोघंही एकमेकांसोबत राहायचे अशीही चर्चा आहे. मात्र नंतर ते वेगळे झाले.
3 / 8
२००९ साली आलेल्या 'कसम से' मालिकेत तिने बानी ही भूमिका साकारली होती. यामध्ये तिची राम कपूरसोबत जोडी होती. यानंतर ती सिनेमांकडे वळली.
4 / 8
प्राची एका मुलाखतीत म्हणाली होती की तिला नात्यात तिचा दोन वेळा विश्वासघात झाला आहे. एकदा तर ती बॉयफ्रेंडसाठी पार परदेशात गेली होती. बॉयफ्रेंडला सरप्राईज द्यायला म्हणून ती पोहोचली तर त्यानेच तिला सरप्राईज केलं. कारण तो तिथे नव्हताच. तो तिच्याशी खोटं बोलला होता.
5 / 8
प्राची म्हणाली, 'मी या गोष्टीचा बाऊ केला नाही. उलट मी शांत राहून प्रतिक्रिया देणं पसंत केलं. अशा गोष्टींना मी शांततेच हँडल करते.'
6 / 8
लग्नाच्या प्रश्नावर प्राची म्हणाली, 'मी स्क्रीनवर इतक्यांदा लग्न केलं आहे की आता मी वैतागले आहे. जेव्हा माझे मित्र म्हणतात की त्यांचे आईवडील त्यांच्यावर लग्नासाठी जोर देत आहेत तेव्हा मला विचित्र वाटतं. कारण माझे आईवडील कधीच असं करत नाहीत.'
7 / 8
ती पुढे म्हणाली, 'मी माझ्या अटींवर जगते. मला स्वातंत्र्याने जगायचं असतं आणि हे मी लग्नासाठी सोडू शकत नाही. मग लग्न करायला काही वर्ष उशीर का होईना.
8 / 8
प्राची नुकतीच 'सायलेन्स 2' आणि 'धूता' या सीरिजमध्ये दिसली. मोजक्याच सिनेमांमध्ये काम करुनही ती कोट्यवधींची मालकीण आहे. अभिनेत्रीकडे ७० ते ७५ कोटींची संपत्ती आहे.
टॅग्स :प्राची देसाईबॉलिवूडरिलेशनशिपलग्न