Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लापता लेडीज' फेम २५ वर्षीय जया 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय डेट? रोमँटिक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:24 IST

1 / 7
'लापता लेडीज' सिनेमा लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टरवर लोकांनी भरभरुन प्रेम केलं. याच सिनेमात जयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतिभा रंटा आता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत आहे
2 / 7
हा अभिनेता आहे रोहित सराफ. रोहित आणि प्रतिभा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या.
3 / 7
या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना खरी सुरुवात झाली ती निखिल अडवाणींच्या आगामी 'द रिव्होल्युशनरीज' या वेब सीरिजच्या शूटिंगपासून. या सीरिजमध्ये रोहित आणि प्रतिभा मुख्य भूमिकेत असून शूटिंग दरम्यान त्यांच्यात जवळीकता वाढल्याचे बोलले जात आहे.
4 / 7
काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये रोहित - प्रतिभा या दोघांचा निखिल अडवाणींसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांच्यातलं मैत्रीपूर्ण प्रेमळ नातं स्पष्टपणे दिसत होतं
5 / 7
रोहित आणि प्रतिभा या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे कोणतीही कबुली दिलेली नाही. सध्या तरीही हे दोघे करिअरवर फोकस करणार असल्याचं समजतंय.
6 / 7
रोहित आणि प्रतिभा हे दोघेही स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये नाव कमावत आहेत. कोणतंही फिल्मी बॅकग्राऊंड नसूनही दोघांनी आज लोकप्रियता मिळाली आहे
7 / 7
आता रोहित आणि प्रतिभा खरंच एकमेकांना डेट करत आहेत का, यावर प्रश्नचिन्ह आहे. तरीही या दोघांना भविष्यात एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेत
टॅग्स :बॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकाररिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट