IN PICS : अद्याप मलायकाशी लग्न का केलं नाही? अर्जुन कपूरनं ‘कॉफी विद करण 7’मध्ये केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 15:46 IST
1 / 10अर्जुन कपूर व मलायका अरोराचं नातं कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. मलायकाचा घटस्फोट होईपर्यंत जोडप्यानं आपलं नातं लपवण्याचा खटाटोप केला. पण नंतर सगळंच जगजाहिर झालं. आताश: दोघंही अगदी बिनधास्त फिरताना दिसतात.2 / 10हे कपल सतत चर्चेत असतं. पण सध्या चर्चा आहे तर अर्जुन कपूरने केलेल्या खुलाशांची. होय, अर्जुनने अलीकडे ‘कॉफी विद करण 7’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली.3 / 10या शोमध्ये अर्जुनने मलायकाबद्दल अनेक खुलासे केलेत. सुरुवातीला नातं का लपवलं? अद्यापही मलायकासोबत लग्न का केलं नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्याने दिलीत.4 / 10 ‘कॉफी विथ करण’मध्ये सेलिब्रिटींना नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले आहेत. करण जोहरने या संधीचा पुरेपूर फायदा घेत अर्जुनला त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराविषयी बरेच प्रश्न विचारले.5 / 10 मलायकासोबतचं नातं जगजाहीर करण्याचं कधी ठरवलं? कोणाकोणाला त्याबद्दल माहिती होती आणि लग्नाबद्दल काय विचार आहेत? असे प्रश्न करणने केलेत. यावर अर्जुनने मनमोकळी उत्तर दिलीत.6 / 10मलायकाशी इतक्यात लग्न करण्याचा कोणताच विचार नसल्याचं अर्जुनने स्पष्ट केलं. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास लॉकडाऊनमध्ये गेलेली दोन वर्ष, कोरोना महामारी आणि त्यामुळे बदललेल्या गोष्टी माझ्या लग्न न करण्याच्या निर्णयासाठी कारणीभूत आहेत. सध्या मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे, असं अर्जुन म्हणाला.7 / 10 मी एक अत्यंत वास्तववादी व्यक्ती आहे मला काहीही लपवण्याची गरज नाही. मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. मला खरोखर व्यावसायिकदृष्ट्या थोडं अधिक स्थिर व्हायला आवडेल. मी आर्थिकदृष्ट्या बोलत नाही, मी भावनिकदृष्ट्या या गोष्टींचा विचार करत आहे. मला असं काम करायला आवडेल ज्यातून मला आनंद मिळेल, असं तो म्हणाला.8 / 10 मी स्वत: आनंदी असलो तर माझ्या जोडीदारालाही आनंदी ठेवू शकेन. मी सुखी जीवन जगू शकतो आणि मला वाटतं की माझा बराचसा आनंद हा मला माझ्या कामातून येतो, असं अर्जुनने स्पष्ट केलं.9 / 10मलायका व अर्जुनने 2019 साली आपलं नातं पब्लिक केलं होतं. याबद्दलही तो बोलला. मलायकाचा मुलगा आता 19 वर्षांचा आहे. त्याचं वय लक्षात घेता आम्ही आमच्या नातं पब्लिक करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली. मला माझ्या जवळच्या लोकांना कम्फर्ट फील करायचं होतं आणि नंतर या नात्याबद्दल सांगायचं होतं, असं तो म्हणाला.10 / 10अर्जुनच्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट लिहित मलायकाने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा पार्ट्यांमध्येही या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मीडियावर होत असतात.