Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कहो ना प्यार है' फेम बालकलाकाराने रिजेक्ट केली होती 'गदर'ची ऑफर; आता काय करतोय हा अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 15:07 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा 'कहो ना प्यार हैं' हा सिनेमा कोणताही प्रेक्षकवर्ग विसरणार नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.
2 / 9
हा सिनेमा रिलीज होऊन जवळपास २४ वर्ष झाली आहेत. मात्र, त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही.
3 / 9
सध्या सोशल मीडियावर या सिनेमातील बालकलाकार म्हणजेच अभिनेता अभिषेक शर्मा याची चर्चा रंगली आहे.
4 / 9
अभिषेक शर्मा याने या सिनेमा हृतिकच्या लहान भावाची अमितची भूमिका साकारली होती.
5 / 9
या सिनेमानंतर अभिषेक काही मोजक्या सिनेमांमध्ये झळकला परंतु, त्यानंतर तो अचानकपणे इंडस्ट्रीतून गायब झाला.
6 / 9
अभिषेकने या सिनेमात काम करुन बरीच लोकप्रियता मिळवली. या सिनेमानंतर तो अन्य काही सिनेमांमध्येही झळकला. मात्र, त्यानंतर त्याचा रुपेरी पडद्यावरचा वावर कमी झाला.
7 / 9
सिनेमातील छोटा अमित आता मोठा झाला असून रुपेरी पडद्यापासून जरी तो दूर गेला असला तरीदेखील छोट्या पडद्यावर नशीब आजमावत आहे.
8 / 9
अभिषेकने सनी देओलच्या चॅम्पियन या सिनेमातही काम केलं होतं. इकतंच नाही तर त्याला गदर सिनेमाचीही ऑफर मिळाली होती. मात्र, त्याने ती धुडकावली.
9 / 9
सध्या अभिषेक छोट्या पडद्यावर त्याचं नशीब आजमावत आहे. ससुराल सिमर का, दिल मिल गए, दिल दिया गल्ला, हिरो गायब मोड ऑन आणि रम पम पो या मालिकांमध्ये तो झळकला होता.
टॅग्स :बॉलिवूडहृतिक रोशनसिनेमासेलिब्रिटीटेलिव्हिजन