Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचे सोशल मीडियावर शाहरुखपेक्षाही जास्त फॉलोअर्स; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:50 IST

1 / 8
बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. आपल्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शाहरुखने त्याच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
2 / 8
सोशल मीडियावर सुद्धा किंग खानची फॅनफॉलोइंग तगडी आहे. अभिनेत्याची केवळ एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात.
3 / 8
परंतु अवघ्या २३ वर्षांच्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर फॅनफॉलोइंगच्या बाबतीत शाहरुखलाही मागे टाकलं आहे
4 / 8
ही अभिनेत्री जन्नत जुबैर आहे. सध्या मनोरंजन विश्वात जन्नत जुबैरबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. यामागे खास कारण आहे.
5 / 8
अभिनेत्री, सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून ओळखली जाणारी जन्नत झुबैरचे इन्स्टाग्रावर ४९.७ मिलीयन फॉलोअर्स आहेत.
6 / 8
जे शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त आहेत. तर शाहरुख खानचे ४७.७ मिलीयन फॉलोअर्स आहेत. म्हणजेच सोशल मीडियावर शाहरुखपेक्षा जन्नतची सर्वाधिक फॅनफॉलोइंग आहे.
7 / 8
जन्नत जुबैरने तिच्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली. 'फुलवा', 'तू आशिकी' यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये तिने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलंय. 'खतरों के खिलाड़ी-12' मध्येही ती झळकली.
8 / 8
जन्नत सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असून त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचं ती मनोरंजन करते. यासोबत तिने राणी मुखर्जीसोबत 'हिचकी' चित्रपटात देखील स्क्रीन शेअर केली आहे. अगदी लहान वयातच तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडटिव्ही कलाकारसोशल मीडिया