Join us

३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करतोय गोविंदा?; भाचा म्हणाला, “जर मामा नवीन मामी घेऊन...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:55 IST

1 / 10
६१ वर्षीय गोविंदाच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. तो एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.
2 / 10
सुनीता आहुजा यांच्यासोबतच्या गोविंदाच्या वैवाहिक जीवनात या अफेअरमुळेच वाद निर्माण झाला. सुनीता यांनी पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती.
3 / 10
गोविंदाच्या अफेअरच्या अफवांमध्ये किती तथ्य आहे यावर त्याचा भाचा विनय आनंदने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अफेअर ही अफवा असल्याचं म्हटलं आहे.
4 / 10
एका मुलाखतीत विनय म्हणाला, “जर मामा नवीन मामी घेऊन येणार असेल तर तो मला सांगेल. असं काही नाही. या अफवा सुपरस्टारबद्दल पसरत असतात.”
5 / 10
'कधीकधी गैरसमज होतात. मामीच्या मनात नेमकं काय आलं असेल काय माहित.'
6 / 10
'मामी चुकीची आहे असं मी म्हणू शकत नाही. कारण मी तिचा खूप आदर करतो. माझा मामा माझ्या वडिलांसारखा आहे. मी प्रार्थना करतो की, या दोघांमध्ये सर्व काही नीट व्हावं'
7 / 10
“सर्व स्टार्ससोबत असं होत असतं. हे वर्ष काहीसं असंच आहे. जर मामी नाराज झाली असेल तर तिला काहीही बोलण्याचा अधिकार आहे.'
8 / 10
'लोकांना मामीचं बोलणं विचित्र वाटेल. एक गोष्ट लक्षात घ्या, मामी बोलत आहे. पण मामाने कोणतंही चुकीचं विधान केलेलं नाही.'
9 / 10
गोविंदा-सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दोघांमधील वाद मिटला आहे, सर्व काही ठीक असल्याचा दावा केला जात आहे.
10 / 10
टॅग्स :गोविंदाघटस्फोटबॉलिवूडलग्न