By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:11 IST
1 / 7सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टरला लोकांनी प्रेम दिलंय. अशातच 'धुरंधर २' मधील अशाच एका कॅरेक्टरची सध्या चर्चा आहे. तो म्हणजे 'पिंडा'2 / 7जसकीरत सिंगचा खास मित्र असलेला पिंडाची भूमिका उदयबीर संधू या अभिनेत्याने साकारली आहे. पिंडाचं वय सिनेमात एकाच वेळी २० आणि ४० दिसतं. एकाच सिनेमात दोन भिन्न वय रंगवण्यासाठी उदयबीरने खास मेहनत घेतली आहे.3 / 7पडद्यावर दोन भिन्न रुपात येणारा पिंडा एकाच अभिनेत्याने साकारलाय यावर विश्वास बसणार नाही, इतकी ही भूमिका उदयबीरने मेहनतीने रंगवली आहे. या भूमिकेसाठी उदयबीरने फार कमी कालावधीत तब्बल १५ किलो वजन कमी केलं होतं.4 / 7उदयबीरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याचा खुलासा केलाय. प्रचंड शिस्त, भरपूर व्यायाम आणि योग्य डाएट या तीन गोष्टी फॉलो करुन उदयबीरने आपलं वजन कमी केलं आहे.5 / 7पोट कमी करण्यासाठी उदयने खास ट्रेनिंग घेतलं, अशीही चर्चा आहे. पुढे वजन वाढवण्यासाठी उदयबीरने त्यासाठी विशिष्ट व्यायाम केला. याशिवाय प्रोटिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने उदयबीरचं वजन वाढण्यास मदत झाली.6 / 7अशाप्रकारे उदयबीरने केलेल्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनचं सर्वजण कौतुक करत आहेत. उदयबीरने शारीरिक बदल केला आहेच शिवाय अभिनयातही छाप सोडली आहे7 / 7उदयबीरने 'धुरंधर २' आधी अमर सिंग चमकिला, गोल्ड अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय. उदयबीरला 'धुरंधर २' मधून खरी लोकप्रियता मिळाली.