By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:40 IST
1 / 7'छावा' सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. अक्षय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत असून अभिनेत्याचे हे सिनेमेही पाहणं मस्ट वॉच आहे.2 / 7अक्षय खन्नाचा काही वर्षांपूर्वी आलेला 'दृश्यम २' सिनेमा चांगलाच गाजला. 'दृश्यम २'मध्ये अक्षयने साकारलेली छोटीशी भूमिका चांगलीच गाजली.3 / 7अक्षय खन्नाचं नाव घेतलं तर आठवतो 'दिल चाहता है'. या सिनेमात अक्षयने साकारलेली सिडची भूमिका चांगलीच गाजली4 / 7अक्षयची आजवरची वेगळी भूमिका आणि वेगळा सिनेमा म्हणजे 'गांधी माय फादर'. अक्षयने या सिनेमात महात्मा गांधींचा मुलगा हरिलाल गांधींची भूमिका साकारलेली.5 / 7अक्षय खन्नाने गंभीर भूमिका साकारल्याच शिवाय कॉमेडी भूमिकांमध्ये छाप पाडली. अक्षयने 'हंगामा' सिनेमात साकारलेली जितूची भूमिका चांगलीच गाजली.6 / 7'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमात अक्षय खन्नाने संजय बारुची भूमिका साकारली होती. अक्षयची ही वेगळी भूमिकाही प्रेक्षक-समीक्षकांना आवडली.7 / 7सैफ अली खानचा 'रेस' सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला. या सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेली सैफ अली खानच्या भावाची खलनायकी भूमिकाही लोकप्रिय ठरली.