1 / 7बॉलिवूड अभिनेत्री वामिका गब्बी तिचा आगामी चित्रपट भूल चूक माफ च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.2 / 7अलिकडच्या दिवसांमध्ये 'भूल चूक माफ' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होती. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. 3 / 7परंतु, त्याला पीव्हीआर आयनॉक्सने विरोध केल्याने आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या २३ मे ला हा सिनेमा थिएटरमध्ये जगभरात रिलीज करण्यात येणार आहे. 4 / 7या चित्रपटामध्ये वामिका गब्बी अभिनेता राजकुमार रावसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 5 / 7दरम्यान,सोशल मीडियावर वामिका गब्बी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 6 / 7फिकट गुलाबी रंगाची साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज आणि त्यावर साजेसे कानातले असा लूक तिने केला आहे. 7 / 7'भूल चूक माफ' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने हा खास लूक केला आहे. 'जो है धडकन सबके दिल की जिसका नाम है तितली...' असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या या फोटोंना दिलं आहे.