Avneet Kaur : "मी बॅट घेतली अन् त्याला धू धू धुतलं"; होळीच्या दिवशी गैरवर्तन होताच अभिनेत्रीचा रुद्रावतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:49 IST
1 / 9अवनीत कौर ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अवनीतने बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिच्या फोटोंची नेहमीच जोरदार चर्चा रंगलेली असते. 2 / 9अवनीतने अलीकडेच खुलासा केला की, होळीच्या दिवशी एका मुलाने तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं होतं. हॉटरफ्लायशी बोलताना अभिनेत्रीने तिच्या बालपणी होळीच्या वेळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला. 3 / 9'होळीच्या वेळी मी एका मुलाला मला फुगा मारू नकोस असे सांगितलं, पण तरी त्याने रंगांनी मारलेला फुगा माझ्यावर फेकला. मला राग आला मी म्हटलं आता तू कामातून गेलास.'4 / 9'तुला माहीत नाही की, मी किती धोकादायक मुलगी आहे. मी बॅट घेतली आणि त्याला मारहाण केली. धू धू धुतलं. मी मुलाला बॅटने मारल्यानंतर त्याची आई माझ्या आईकडे तक्रार करण्यासाठी आली.' 5 / 9'मुलाची आई माझ्या आईला म्हणाली की, तुमच्या मुलीने माझ्या मुलाला मारहाण केली आहे. यावर माझ्या आईन माझी बाजू घेतली आणि त्याने चुकीची गोष्ट केल्यामुळे मुलीने मारल्याचं म्हटलं' असं अवनीतने सांगितलं.6 / 9एका प्रसिद्ध साबण जाहिरातीच्या व्हिडिओमुळे शाळेत अभिनेत्रीची थट्टा करण्यात आली होती. अवनीतने सांगितलं की, जेव्हा जेव्हा ती शाळेच्या कॉरिडॉरमधून जायची तेव्हा मुलं 'अरे, बंटी, तुझा साबण...' असं म्हणत चेष्टा करायचे. 7 / 9'मी स्टार असल्याने लोक माझा दृष्टिकोन असाच समजत होते. मी अशीच आहे, पण लोकांना कोण सांगणार?' असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे. 8 / 9अवनीत कौर लवकरच 'लव्ह इन व्हिएतनाम' आणि हॉलिवूड चित्रपट, टॉम क्रूझचा 'मिशन: इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंग: पार्ट टू' मध्ये दिसणार आहे.9 / 9