Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday Annu Kapoor : आधी घटस्फोट मग दुसरं लग्न अन् पुन्हा पहिल्या पत्नीच्या प्रेमात, अभिनेते अन्नू कपूर यांची अनोखी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 09:37 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर आज 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.त्यांचं खरं नाव अनिल कपूर आहे मात्र फिल्म इंडस्ट्रीत आधीच एका यशस्वी अभिनेत्याचं नाव अनिल कपूर असल्याने त्यांनी स्वत:चं नाव अन्नू कपूर केलं.
2 / 9
अन्नू कपूर यांचं वैयक्तिक आयुष्य खूपच इंटरेस्टिंग आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट, दुसरं लग्न अन् पुन्हा पहिल्या पत्नीच्या प्रेमात पडले अशी काही सिनेमाची कहाणी वाटावी असं त्यांचं आयुष्य आहे. नक्की काय आहे हा किस्सा बघा
3 / 9
अन्नू कपूर यांनी १९९२ मध्ये अनुपमा कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र एका वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अनुपमा अमेरिकेला गेल्या.
4 / 9
इकडे अन्नू यांची भेट अरुणिता यांच्याशी झाली. १९९५ मध्ये त्यांनी लग्न केलं. २००१ मध्ये त्यांना एक मुलगीही झाली.
5 / 9
अचानक एके दिवशी अन्नू आणि पहिली पत्नी अनुपमा यांची अमेरिकेत भेट झाली. ते पुन्हा संपर्कात आले. त्यांच्यातील भेटणं बोलणं इतकं वाढलं की ते पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले.
6 / 9
दरम्यान त्यांची दुसरी पत्नी अरुणिता यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय येत होता.अनुपमा यांचा फोन येताच अन्नू खोलीतून बाहेर जायचे हे त्यांना दिसत होतं. अखेर एके दिवशी त्यांना सगळं कळलं.
7 / 9
या सर्व प्रकारानंतर अरुणिता यांनी घटस्फोट दिला आणि अन्नू कपूर यांनी पुन्हा पहिली पत्नी अनुपमा यांच्याशी २००८ मध्ये विवाह केला. लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली.
8 / 9
अन्नू कपूर यांनी २३ व्या वर्षी ७३ वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. श्याम बेनेगल यांनी त्यांना बघितलं आणि बॉलिवूडमध्ये आणलं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट भूमिका साकारल्या आहेत.
9 / 9
अन्नू कपूर टीव्हीवर अंताक्षरी शो होस्ट करत होते. हा शो भलताच गाजला होता. मंडी या सिनेमातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती मात्र उत्सव या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळाली.यातील विनोदी भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.
टॅग्स :अन्नू कपूरपरिवारबॉलिवूडसिनेमा